शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला शिवजयंतीचे मोठे कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:25 IST

सिन्नर: शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण काहीसे वाढत असल्याने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी सांगितले.

ठळक मुद्दे संयुक्त शिवजन्मोत्सव : छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन

आडवा फाटा येथे उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आणि माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सर्व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यास स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे उगले यांनी सांगितले.यावेळी तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, राजेंद्र जगताप, रवींद्र काकड, राजाराम मुरकुटे, राजाराम मुंगसे, आनंदा सालमुठे, संदीप शेळके, मेघा दराडे, मंगल गोसावी, सरला गायकवाड यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांसह मोजके नागरिक सामाजिक अंतर पाळून व मास्कचा वापर करीत उपस्थित होते.वावी येथे अभिषेक व महाआरतीसिन्नर तालुक्यातील वावी येथे छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी छत्रपतींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी घोड्यांच्या नृत्यांच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रेयस माळवे या युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा परिधान केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, माजी सरपंच विजय काटे, रामनाथ कर्पे, कन्हैयालाल भुतडा, डॉ. कमलाकर कपोते, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नवले, आशिष माळवे, संदीप राजेभोसले, अक्षय खर्डे, संतोष जोशी, विजय सोमाणी, दिलीप वेलजाळी, संजय भोसले, मंदार केसकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकShivjayantiशिवजयंती