शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी कर्ज परतफेड; तीस कोटी वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:23 IST

सव्वाशे कोटी रुपयांची देणी चुकविण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये एकरकमी परतफेड करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे किमान तीस कोटी रुपयांची वर्षाला बचत होणार आहे. महापालिकेत सध्या २०७ कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध असून, त्यातून म्हणजेच सर्वसाधारण फंडातून ही परतफेड होणार असल्याने भांडवली कामांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचा महापालिकेचा दावा आहे.

नाशिक : सव्वाशे कोटी रुपयांची देणी चुकविण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये एकरकमी परतफेड करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे किमान तीस कोटी रुपयांची वर्षाला बचत होणार आहे. महापालिकेत सध्या २०७ कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध असून, त्यातून म्हणजेच सर्वसाधारण फंडातून ही परतफेड होणार असल्याने भांडवली कामांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचा महापालिकेचा दावा आहे.  नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ९५ कोटी रुपये आणि नंतर नेहरू नागरी अभियानातील प्रलंबित घरकुल योजनेसाठी ३५ कोटी रुपये असे १३० कोटी रुपयांचे कर्ज बॅँक आॅफ महाराष्टकडून घेण्यात आले आहे. त्यातील ११८ कोटी ५१ लाख रुपयांची परतफेड करणे बाकी असून, ही रक्कम एकरकमी भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास गेल्याच आठवड्यात मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कर्ज घेऊन साडेचारशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते, त्यापैकी ९५ कोटी रुपयांची प्रत्यक्षात उचल घेतली होती तर अर्धवट राहिलेल्या घरकुल योजनेसाठी ९० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ३५ कोटी रुपयांची उचल घेतली होती. या कर्जासाठी ९.३० टक्के व्याजदर महापालिकेला भरावा लागत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या विविध बॅँकांमध्ये ठेवी असून, त्यावर अवघे सहा ते सात टक्के व्याज मिळत असल्याने विसगंत चित्र होते.  सुदैवाने महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली होत असून, २०७ कोटी रुपयांची गंगाजळी वाढली असल्याने महापालिकेला तूर्तास ११८ कोटी रुपयांची परतफेड करणे सहज शक्य असल्याने त्यानुसार परतफेड करणे शक्य आहे. सदरची रक्कम फेडल्यास महापालिकेचे सुमारे तीस कोटी रुपये वाचणार आहेत.यापुढे फक्त सॉफ्ट लोनमहापालिका शक्यतो कर्ज काढणार नसून काढायचे असल्यास दीर्घ मुदतीचे कर्ज काढण्यापेक्षा सॉफ्ट लोनवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे चार ते सहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. विशेष म्हणजे नाशिक महापालिका ब दर्जाची असल्याने जागतिक बॅँकेकडूनदेखील कर्ज घेता येणार आहे.४महापालिकेला मक्तेदारांना देयके देण्यासाठी साधारणत: चाळीस ते पन्नास कोटी रुपये महिन्याकाठी लागतील त्यानुसार आर्थिक उपलब्धता आहे, शिवाय बजेटमध्ये मंजूर रकमांच्या कामांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका