शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

आशा गटप्रवर्तकांचे मानधनवाढीसाठी मूक निदशर्ने ; मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:57 IST

महाराष्ट्रात सुमारे ९० हजार  आशा व गटप्रवर्तक  आरोग्य विभागात कार्यरत असून या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोनलन पुकारले असून अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील आशा व गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासोर मूक निदर्शेने करीत नाशिकमध्ये संवाद यांत्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार आहे. 

ठळक मुद्देआशा व गटप्रवर्तकांची मानधन वाढीची मागणी मागील 15 दिवसांपासून कामबंद आंदोलन मुख्यमंत्र्यांना गुलाबपुष्प देऊन घालणार साकडे

नाशिक : महाराष्ट्रात सुमारे ९० हजार  आशा व गटप्रवर्तक  आरोग्य विभागात कार्यरत असून या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोनलन पुकारले असून अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील आशा व गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासोर चेहऱ्यांवर काळे कपडे बांधून मूक निदर्शेने केली. तसेच संवाद यांत्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन  मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.आशा व गटप्रवर्तकांतर्फे राज्यभर मोर्चे, जेलभरो, आंदोलन, आमदार खासदारांना निवेदन, राज्यातील मंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहेत. आशा व गटप्रवर्तकांना राज्य शासनानेतीनपट मानधन वाढीचे दिलेले आश्वासन निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, तसेच यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करावा या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरु असून शनिवारी नाशिक शहरात कृतीसमितीच्या यावेळी अर्चना गडाख, विजय दराडे,  सायली महाले,  ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, सुरांजे गायत्री,  शीतल खत्री, धनश्री गाडे, पौर्णिमा भगत, कावेरी बेंडकुळी, मिना अत्रे,  प्रणाली सोनवणे,  संगीता वाघ,  सरला बोरसे आदी शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासमोर मूक निदर्शेने केली. त्याचप्रमाणे जिल्हाभरात तालुकास्तरावर महापुरुषांच्या पुतळयाजवळ मूक निदर्शने करीत आशा व गट प्रवर्तकांना मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी केली असून व्यात मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधील रोड शो दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक १५ हजार  गुलाब पुष्प देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार आहेत.  

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिक