काळ्या वेशभूषेत मराठा समाजाची मूक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:35+5:302021-06-22T04:11:35+5:30

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या - राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी. - मराठा आरक्षणासाठी राज्याने प्रस्ताव ...

The silent role of the Maratha community in black attire | काळ्या वेशभूषेत मराठा समाजाची मूक भूमिका

काळ्या वेशभूषेत मराठा समाजाची मूक भूमिका

Next

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या

- राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी.

- मराठा आरक्षणासाठी राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे तो पाठवावा.

- ‘सारथी’ संस्थेची स्वायत्ता अबाधित राखून सर्व महसुली विभागात कार्यालये व प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्रे सुरू करावीत.

- पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह वाढ करावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी.

- आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी जागा निर्माण कराव्यात.

- कोपर्डी प्रकरण स्वतंत्र जलदगती न्यायालयात चालवून दोषींना शिक्षेचा विषय तत्काळ निकाली लावावा.

---

काळ्या रंगाची वेशभूषा

मराठा समाजाच्या बैठकीत सोमवारी (दि. २१) होणाऱ्या आंदोलनाची आचारसंहिताही जाहीर करण्यात आली. त्यानुसार सर्वांनी काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून यावे, आंदोलनस्थळावर नो मास्क, नो एन्ट्री नियम असून, प्रत्येकाने काळा मास्क वापरण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, सॅनिटायझर सोबत ठेवून त्याचा वापर करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत.

--

असे झाले आंदोलन

९.०० समन्वयक आंदोलनस्थळी पोहोचण्यास सुरुवात

९.५० समन्वयक, नोकरभरतीची मुले आंदोलस्थळी दाखल

९. ५५ लोकप्रतनिधींच्या आगमनास सुरुवात

१०.४० खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आंदोलनस्थळी आगमन

१० .४५ छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

१०.४८ संभाजी राजे आंदोलकांमध्ये स्थानापन्न

१०.५० लोकप्रतिनिधींकडून भूमिका मांडण्यास सुरुवात

१२.३० राष्ट्रगीताने मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता.

---

क्षणचित्रे

- छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला ध्वज फडकवताना तरुण

- संभाजीराजे यांच्यासह आंदोलकांना नमस्कार करताना पालकमंत्री छगन भुजबळ

-चिमुकल्या आंदोलकांचा सहभाग

-आसूड घेऊन आंदोलनात सहभागी आंदोलक

- पोलिसांची करडी नजर

Web Title: The silent role of the Maratha community in black attire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.