शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ‘स्मार्ट रोड’चे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:25 IST

भूसंपादनात अडचण : कलम २१० अंतर्गत कार्यवाही करणार

ठळक मुद्देस्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णयस्मार्ट रोडसाठी दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी कंपनीला काही भागात जागा संपादित करावी लागणार

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला असला तरी, या स्मार्ट रोडसाठी दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी कंपनीला काही भागात जागा संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी कलम २१० अंतर्गत कार्यवाही करण्याच्या सूचना कंपनीने महापालिकेच्या नगररचना विभागाला केल्या आहेत. परंतु, केवळ एफएसआयच्या मोबदल्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा देण्याबाबत मालकांकडून प्रतिसाद मिळेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे, स्मार्ट रोडचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाक्यावरील मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर रोडलगत फुटपाथ, सायकल ट्रॅक यासह अन्य सुविधा असणार आहेत. स्मार्ट रोडसाठी कंपनीने निविदाप्रक्रिया राबविली होती. परंतु, पहिल्यांदा निविदाप्रक्रियेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हतो त्यामुळे दुसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबविली असता त्यात तीन जणांनी निविदा भरल्या. आता निविदा प्रक्रिया अंतिम करुन एका एजन्सीला कार्यादेश देण्याची तयारी सुरू आहे. परंतु, कंपनीने बनविलेल्या आराखड्यानुसार, दुतर्फा ७.५ मीटर जागा रस्त्यासाठी सोडून उर्वरित जागेत फुटपाथ, सायकल ट्रॅकची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, ७.५ मीटर जागा सोडताना मेहेर ते अशोकस्तंभ आणि सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल या दरम्यान दुतर्फा जागा संपादित करण्याचे आव्हान कंपनीपुढे आहे. जागामालकांकडून काही प्रमाणात जागा घेताना त्यांना महापालिकेकडून टीडीआर, एफएसआयसारखे लाभ देता येतील काय, यादृष्टीने कंपनीने चाचपणी केली आहे. त्यानुसार, कंपनीने महापालिकेच्या नगररचना विभागाला कलम २१० अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा सामासिक अंतरात येणा-या काही जागा संपादनासाठी कळविले आहे. परंतु, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा देण्याबाबत जागा मालक कितपत अनुकुलता दर्शवतील याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे, प्रस्तावित स्मार्ट रोडचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक