शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:48 IST

विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला जात आहे. गटातटावर अवलंबून असणाऱ्या या निवडणुकीत यंदा मात्र पॅनलनिर्मितीचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीचे वातावरण तापले : गुप्त बैठकांना जोर

निफाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपालिकांपैकी विंचूर हे एक गाव मानले जाते; परंतु गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत एकहाती नेतृत्व विंचूरला लाभले नाही. पूर्वीच्या काळी भास्करराव दरेकर पाटील यांच्या रूपाने एक नेतृत्व होते, तर त्यांच्या विरोधात लक्ष्मणराव माधवराव गुंजाळ यांचे नेतृत्व होते. या दोघांनाही काका नावाने लोक संबोधित. अनेक वर्षे दोन्ही काका एकमेकांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणुका लढावायचे. मात्र नंतरच्या काळात नाशिक जिल्ह्यात विंचूर असे गाव राहिले, की येथे कोणाचे पॅनल निर्मित होऊन एक हाती नेतृत्व तयार झाले नाही.यंदाच्या निवडणुकीत मात्र पॅनलनिर्मिती करून निवडणूक लढवावी या उद्देशाने येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वपक्षीय, सर्व जातीय, धर्माचे, सर्व पक्षांचे सामुदायिक नेतृत्व पुढे येऊन गावासाठी चांगला सक्षम पर्याय देण्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. यापूर्वीच्या निवडणुका प्रत्येक वॉर्डमध्ये आपापले नेतृत्व प्रस्थापित करून निवडणुका व्हायच्या व नंतर सरपंचपदासाठी रस्सीखेच, वेगवेगळ्या गोष्टींचा, जातीचा उपयोग करून सत्ता स्थापन झाल्या. सरपंच व उपसरपंचपदासाठी मोठ्या प्रमाणात निवडणुका झाल्या. यात वेळ, पैसा खर्च झाला. अनेक मोठ्या गावांमध्ये पॅनलनिर्मिती करून निवडणुका लढविल्या जातात, तशा विंचूरलाही व्हाव्यात अशी अनेकांची इच्छा होती. निवडणुकीत सामुदायिक नेतृत्वाने गावाला १७ लोकांचे पॅनल देऊन योग्य पर्याय देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या माध्यमातून गावातील विविध पक्षांतील,सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले. ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या बैठकीस प्रत्येकाने आपली भूमिका मांडली. उपस्थितांनी त्यास अनुमती दिली. या बैठकीत ॲड. संजय दरेकर, किशोर पाटील, संजय शेवाळे, कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, अशोक दरेकर, सचिन दरेकर, अनिल मालपाणी, ॲड. जयंत शिरसाठ, आत्माराम दरेकर, किशोर जेऊघाले, आस्लम शेख, बाळासाहेब नेवगे, योगेश निकाळे, संदीप दरेकर यांनी विचार मांडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढील बैठक सावता महाराज मंदिरात बोलाविण्यात येऊन बैठकींंचे सत्र सुरू झाले. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चर्चा झाली. गावाच्या विकासासाठी सर्वांना सामावून पॅनलनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र आहे. ग्रामपालिका सदस्य कसा असावा, सरपंच कसा असावा, यासाठीचे संदेश, विनोद, मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच यांच्याबाबत यापूर्वी विनोदातून मांडलेले भास्करराव पेरे पाटील आणि इंदोरीकर महाराज यांचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत