शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:06 IST

यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.

नाशिक : यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.कुसुमाग्रज स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत मानव उत्थान मंचतर्फे अंतर्गत ६४ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी ‘लोकसभा निवडणुकीचे अंतरंग’ या विषयावर बोलताना त्यांनी देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे सांगतानाच निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसून त्याऐवजी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे विषय पुढे आणले जात असल्याचे अधोरेखित केले. गेल्या पंचवार्षिकमध्ये २०१४ पेक्षा आता परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणात आता पूर्वीसारखा आवेश नसून ते बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे. सरकारचे परराष्ट्र धोरणही कुचकामी ठरत असून, मागील पाच वर्षांत पंतप्रधानांनी ८६ देशांचे दौरे केले, पण त्यातून भारताला काही लाभ झाल्याचे वाटत नाही. बांगलादेश, श्रीलंका यांसारखे पारंपरिक शेजारी देश आपल्यापासून दुरावले. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. उद्योगधंदे, बँकिंग क्षेत्र अडचणीत आले असून बेरोजगारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एनडीएला २२५ पर्यंतच मजल मारणे शक्य होणार असून, बिजू जनता दल, एआयएडीएमके, तेलगू देसम, वायएसआर पक्ष, टीआरएस यांनी मदत केल्यास एनडीएला पुन्हा देशात सत्ता मिळवता येईल. तर काँग्रेसचीही अशीच स्थिती असून, त्यांनाही बहुमताचा आकडा मिळवणे कठीणच आहे. त्यांच्याकडे किंगमेकरची भूमिका राहू शकते. मात्र कोणत्याही स्थितीत एकाच पक्षाच्या हाती संपूर्ण सत्ता मिळणे यावेळी कठीण असल्याचे मत सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले. शामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. घिया यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक