लोकमत न्यूज नेटवर्क
संजीव धामणे,
नांदगाव : खड्डयांमुळे खूप धक्के बसत असल्याने वेळ लागत होता... अरे... हा रस्ता कधी संपेल? अशी विचारणा करणाऱ्या आजारी महिलेचा उपचारासाठी उशीर झाल्याने मृत्यू झाल्याची घटना वर्षापूर्वी घडली. आजही हा रस्ता तसाच आहे. बोलठाण-रोहिले-मनेगाव फाटा रस्त्याची ही गेल्या पावसाळ्यातली कहाणी आहे.
यंदा मृगाच्या पावसानंतरच चालता येत नाही, अशी अवस्था झाली. मोटारसायकलचे खूप अपघात घडले आहेत. दररोज दोन-तीन गाड्या खड्डे व चिखल चुकवताना घसरून पडतात. मध्यंतरी आर्ट ऑफ लिव्हिंग व व्यापारी, तसेच त्यानंतर शांतिगिरी महाराज यांच्या माध्यमातून मुरूम टाकून डागडुजी केली होती. परंतु पावसामुळे रस्ता पुन्हा ‘जैसे थे’च आहे. सद्यस्थितीत गुडघ्याएवढे खड्डे पडले असून अतिशयोक्ती वाटावी, परंतु गावातल्या सोयरिकीही मोडल्या आहेत. कारण अपघात घडल्याने शकुनाचे संकेत आडवे आले, अशी माहिती अनिल रिंढे यांनी दिली. खड्डयातला चिखल अंगावर उडत असल्याने दुचाकीस्वाराला एक जादा ड्रेस बरोबर घेऊन निघावे लागते.
बोलठाण ही तालुक्यातली दुसरी मोठी बाजारपेठ आहे. कन्नड, वैजापूर येथील शेतीमाल येथे विक्रीसाठी येतो. दररोज ५०० वाहनांची आवक व जावक असते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेले रस्ते टिकत नाहीत. व्यापारी वर्गाचे खळे जातेगाव व रोहिले या रस्त्यावर असून, रस्ता अरुंद व खराब असल्याने येथे दिवसा नेहमीच रहदारीस जाम लागलेला असतो.
ढेकू जातेगाव व बोलठाण रस्त्यावरची खडी उघडी पडली आहे. डांबराचा कोट बाकी आहे. परंतु ठेकेदाराच्या चालढकलीमुळे दीड वर्षापासून रस्ता खराब झाला आहे. तालुक्यात चाळीसगाव, मनमाड रस्ता राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत आहे. तो सुस्थितीत आहे. मालेगाव ते येवला रस्त्याचे काम हायब्रीड अन्युईटीअंतर्गत दोन ठेकेदारांमार्फत सुरू आहे. नांदगाव-मालेगाव (कौळाणे फाटा) रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र नांदगाव-येवला रस्त्यावरील ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही, म्हणून त्याला दोन कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. तरीही काम सुरू नाही. त्यामुळे बेलदारवाडी ते नांदगाव, खिर्डी ते सोमठाण हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.
इन्फो
रस्ते समस्या विकासाला अडसर
अंतर्गत रस्ते लोह शिंगवे, भालूर, वडाळी, मोरझर फाटा, दहेगाव, नांदगाव, सोयगाव, वडाळी, भालूर, लक्ष्मीनगर, मांडवड, नांदगाव, मोहेगाव. हिसवळ आधीपासूनच मलमपट्टी केलेल्या रस्त्यांची पहिल्या काही पावसातच वाट लागली आहे. भार्डी कोंढार नाग्या साक्या व बोयगाव ते दर्हेल रस्ता खूप खराब झाला आहे. तालुक्याची प्रवासवाहिनी असलेले रस्तेच खराब झाल्याने शेतकरी वर्गापासून असर्वांच्याच डचणी निर्माण झाल्या आहेत. छोटे-मोठे अपघात, वाहनांचे यांत्रिकी भाग तुटणे व प्रवासात वेळ लागून, थकवाही येत असल्याने रस्त्याची समस्या विकासातला अडसर ठरली आहे.
फोटो- १२ नांदगाव खबरबात/१
120821\12nsk_13_12082021_13.jpg~120821\12nsk_14_12082021_13.jpg
फोटो- १२ नांदगाव खबरबात/१~फोटो- १२ नांदगाव खबरबात/१