शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची महत्त्वूपर्ण भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:47 IST

सिन्नर : शिवसरस्वतीने राबविलेल्या कुपोषण निमुर्लन अभियानाच्या यशात खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही अशाच प्रकारे काम करून पुढील सहा महिन्यात उर्वरित २५२ बालके कुपोषणातून बाहेर काढून तालुका कुपोषण मुक्त करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी केले.

सिन्नर : शिवसरस्वतीने राबविलेल्या कुपोषण निमुर्लन अभियानाच्या यशात खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही अशाच प्रकारे काम करून पुढील सहा महिन्यात उर्वरित २५२ बालके कुपोषणातून बाहेर काढून तालुका कुपोषण मुक्त करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी केले.फेब्रुवारी महिन्यातील शासकीय आकडेवारी नुसार तीव्र श्रेणीत ६९ कुपोषित मुले शिवसरस्वती फाउंडेशनने दत्तक घेतली. मात्र मे महिन्यात हा आकडा चुकीचा असल्याचे उघड झाले व बालकांची संख्या ११३० वर पोहचली. फेब्रुवारीपासून हाती घेतलेल्या संस्थेच्या कुपोषण निर्मूलनाच्या अभियानात आरोग्य, महिला बाल कल्याण विभागाने अथक परिश्रम घेऊन ग्राम बालविकास केंद्रांच्या माध्यमातून ही संख्या २५२ वर आणली असल्याचे कोकाटे म्हणाल्या.बालदिनानिमित्त शिवसरस्वती फाउंडेशन आयोजित कुपोषण निर्मूलन जागृती अभियान या कार्यक्रमात सीमंतिनी कोकाटे बोलत होत्या. व्यासपीठावर गटविकास अधिकारी लता गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय गिरी, प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे, पर्यवेक्षक लता गवळी, ए. टी. राऊत आदी उपस्थित होते.कुपोषण मुक्तीसाठी अथक परिश्रम अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभत असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत. मात्र कुपोषणाच्या बाबत पालक अनभीज्ञ असल्याने त्यांचे सहकार्य लाभत नाही, त्यासाठी व्यापक जनजागृती असणे अपेक्षित असल्याने कुपोषित बालक, त्यांचे पालक, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्या साठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. लहान मुले ही उद्याचे भविष्य आहे अन उद्याचे भविष्य जर सुदृढ व सक्षम करायचे असेल तर पालकांचे व पदाधिकाºयांचे सहकार्य अपेक्षित आहे. मी हे काम अंगणवाडी सेवकांच्या विरोधात करत नसून तुम्ही व मी मिळून ही सामाजिक जबाबदारी तडीस नेवू. त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका उत्तम काम करतील त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात येईल असे प्रतिपादन कोकाटे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिक