शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बडगुजरांच्या हकालपट्टीसाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:46 IST

पाणीपुरवठ्याचे निमित्त : सेनेतील गटबाजी नाशिक : नाशिक शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी घेऊन शिवसेनेने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली असली तरी, सेनेच्या ही खेळी त्यांच्यातच अंतर्गत गटबाजी वाढविण्यास कारणीभूत ठरली असून, शहराला दोन वेळ पाणीपुरवठा शक्य नसल्याची भूमिका सेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घेतल्याने त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मोहीम सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने हाती घेतल्याचे वृत्त आहे.

नाशिक : नाशिक शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी घेऊन शिवसेनेने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली असली तरी, सेनेच्या ही खेळी त्यांच्यातच अंतर्गत गटबाजी वाढविण्यास कारणीभूत ठरली असून, शहराला दोन वेळ पाणीपुरवठा शक्य नसल्याची भूमिका सेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घेतल्याने त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मोहीम सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने हाती घेतल्याचे वृत्त आहे.यंदा गंगापूर धरण शंभर टक्के भरून समूहातही तितकाच पाणीसाठा असून, नाशिकच्या पाण्यावर डोळा ठेवून असलेले मराठवाड्यातील जायकवाडी धरणही पूर्ण भरले आहे. त्यामुळे नाशिककरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून शहरात दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यासाठी ३७ पैकी ३५ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र सेनेने महापालिका आयुक्तांना दिले आहे. या माागणीतून सत्ताधारी भाजपाची राजकीय कोंडी करण्याचा सेनेचा अंतस्थ हेतु असला तरी, त्यातून सेनेतील गटबाजीच उघड झाली आहे. सेनेच्या ज्या दोन नगरसेवकांची दोन वेळा पाण्याच्या मागणी निवेदनावर स्वाक्षरी नाही, त्यात सुधाकर बडगुजर व त्यांची पत्नी हर्षदा या दोघांचा समावेश आहे. बडगुजर यांना पक्षानेच टाळले की त्यांनीच या निवेदनावर स्वाक्षरी केली नाही हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी, बडगुजर यांनी मात्र या विषयावर सिडकोच्या प्रभाग समितीच्या सभेत आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते शहरात व विशेषत: सिडकोत दोन वेळा पाणीपुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे सांगितले. बडगुजर यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या मागणीच्या विरोधातच भूमिका घेतल्याचा अर्थ त्यातून काढला गेला व सेनेतील गटबाजी तत्काळ उफाळून आली. मुळातच महापालिका निवडणुकीपासूनच सेनेंतर्गत गटबाजीची खदखद कायम असून, बडगुजर यांनी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याची सबब पुढे करीत, सेनेच्या नेतृत्वाने बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करावी यासाठी कंबर कसली आहे. त्याबाबतच्या हालचाली गतिमान होऊन सेनेच्या नगरसेवकांना ‘निरोप’ देऊन निवेदन तयार करण्यात आले व बडगुजर यांची हकालपट्टी करावी यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दहा नगरसेवकांच्या निवेदनावर स्वाक्षºया झाल्या असून, सेनेचा दसरा मेळावा आटोपल्यानंतर यावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.