शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा बॅकफूटवर येण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:46 IST

महापालिका महासभेने मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ या शासकीय निवासस्थानासमोरच घरपट्टीची होळी करत निषेध नोंदविला

नाशिक : महापालिका महासभेने मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ या शासकीय निवासस्थानासमोरच घरपट्टीची होळी करत निषेध नोंदविला, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. करवाढीविरोधात वाढते जनमत लक्षात घेता सत्ताधारी भाजपाकडून आता बॅकफूटवर येण्याचे संकेत मिळत असून, वाणिज्यिक आणि औद्योगिक दर ‘जैसे थे’ ठेवत निवासी मिळकत कराच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंगळवारी (दि. २०) झालेल्या महासभेत महापौरांनी आयुक्तांनी ठेवलेल्या करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देतानाच भांडवली मूल्याऐवजी भाडेमूल्यावर आधारित करवाढीस मान्यता दिली. त्यामुळे, निवासी घरपट्टीत ३३ टक्के, अनिवासीमध्ये ६४ टक्के तर औद्योगिकमध्ये ८२ टक्के दरवाढ होणार आहे.  सदर दरवाढीस सभागृहातच शिवसेनेसह कॉँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांनी विरोध दर्शवत सभात्याग केला होता. दरवाढीच्या या निर्णयाचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली असून, सोशल मीडियावरही त्याबाबत विरोधाचा सूर निघत आहे. बुधवारी सकाळी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करण्यात आली.  व्यापारी व उद्योजकांमधूनही या दरवाढीविरोधात सूर उमटला. या करवाढीविरोधी तयार होत चाललेले जनमत लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपा आता बॅकफूटवर येण्याचे संकेत मिळत आहेत. प्रामुख्याने, निवासी दर कमी करण्याची शक्यता असून, औद्योगिक आणि वाणिज्यिक दर मात्र ‘जैसे थे’ ठेवण्याची चिन्हे आहेत. निवासी दर कमी करून सामान्य माणसांना दिलासा दिला जाण्याची शक्यता भाजपाच्या सूत्रांनी बोलून दाखविली आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून बुधवारी (दि. २१) महापौरांसह भाजपा पदाधिकाºयांनी माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका