सिडको : घरमालकाने घरभाडे मागितल्याचा तसेच घर खाली करण्याचे सांगितल्याचा राग आलेल्या भाडेकरूने तलवारीने वार केल्याची घटना सिडकोतील आनंदनगर, तोरणानगर भागात शुक्रवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन पवार हे आनंदनगर, तोरणानगर भागात राहतात़ त्यांनी आपले घर दिलीप दंडगव्हाळ यास भाड्याने दिलेले आहे़ मात्र, घरभाडे द्यावे तसेच घर खाली करण्यास पवार यांनी सांगितल्याचा राग येऊन दंडगव्हाळ याने पवार यांच्या हातावर तलवारीने वार केले़ यामध्ये जखमी झालेल्या पवार यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित दंडगव्हाळवर गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे़ (वार्ताहर)
सिडकोत घरमालकावर तलवारीने हल्ला
By admin | Updated: April 11, 2015 00:30 IST