शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी एकजूट हवी श्याम रजक : परीट समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात विविध ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:45 IST

नाशिक : राज्यात सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक असलेल्या परीट समाजाला इतर मागासवर्गीय गटात (ओबीसी) समाविष्ट करून सरकारने अन्याय केला आहे.

ठळक मुद्देसरकार वंचित ठेवू शकत नाहीताकद उभी करण्याची खरी गरज

नाशिक : राज्यात सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक असलेल्या परीट समाजाला इतर मागासवर्गीय गटात (ओबीसी) समाविष्ट करून सरकारने अन्याय केला आहे. या समाजाला आरक्षणापासून कोणतेही सरकार वंचित ठेवू शकत नाही. गरज आहे ती, समाजाने एकजूट होण्याची. राज्यातील परीट समाजबांधव या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून, हे समाज उत्कर्षाचे द्योतक च आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय परीट महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष बिहारचे माजी मंत्री श्याम रजक यांनी केले. राज्य परीट सेवा मंडळाच्या नाशिक जिल्ह्णाच्या वतीने भाभानगरमध्ये रविवारी (दि.४) आयोजित ११व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून रजक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परीट सुकाणू समिती अध्यक्ष किसन जोर्वेकर, प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे, राष्टÑीय महिला अध्यक्ष उषा फाले, कृष्णकुमार कनोजिया, मदन चिलाटे, नगरसेवक राहुल दिवे, अमित खत्री, तुकाराम दळवी, कल्पना गायकवाड, संतोष भालेकर, सुरेश नाशिककर, वत्सला खैरनार, अरुणा जोर्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पाहुुण्यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ‘गोपाला-गोपाला देवकि नंदन गोपाला’चा जयघोषाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. अधिवेशनाला मुंबई, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशीम, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, अहमदनगर, भंडारा, सातारा आदी जिल्ह्णांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव दाखल झाले होते. यावेळी रजक बोलताना म्हणाले, आरक्षण हा परीट समाजाचा अधिकार आहे आणि हा अधिकार मिळविल्याशिवाय समाज राहणार नाही. सरकार भाजपाचे असो किंवा अन्य कोणाचे परीट समाजाला आरक्षण महाराष्टÑात सरकारला द्यावेच लागेल. समाजाने एकत्र येऊन यासाठी ताकद उभी करण्याची खरी गरज आहे. दरम्यान, मंचावरील विविध मान्यवरांसह ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. फाले, बोरसे यांनीही मनोगतातून समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक मुद्द्यांवर चर्चा केली. मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.संयमाचा अंत पाहू नयेसरकारने परीट (धोबी) समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये. सरकारने समाजाला आरक्षण दिल्यास समाजालाही सर्व स्तरात प्रगती साधता येईल. परीट समाज हा अनुसूचित जाती-जमातीमधील असून, या समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून सरकारने अन्याय केला, असा सूर अधिवेशनातून उमटला. आरक्षणाचा हक्क समाज मिळविल्याशिवाय शांत बसणार नाही, हा या अधिवेशनाप्रसंगीचा मुख्य ठराव सर्व समाजबांधवांच्या वतीने करण्यात आला. देशातील अन्य सतरा राज्यांप्रमाणेच महाराष्टÑातही परीट-धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत देण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी. लॉन्ड्री व्यवसायाला सवलतीच्या दरात वीजपुरवठा द्यावा. संत गाडगेबाबा यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी करण्याचा सरकारी आदेश काढल्याने राज्य सरकारचे अभिनंदन. संत गाडगेबाबा यांच्या भूमीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करावा. मंबई-अमरावती मार्गावरील रेल्वे एक्स्प्रेसला संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे.