शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी पशुवैद्यकीय दवाखान्यात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:23 IST

अनेक पदे रिक्त : पशुंचे उपचाराविना हाल

ठळक मुद्देनांदगांव येथे प्रथमवर्ग पशुवैद्यकिय दवाखान्यात पूर्ण वेळ अधिकारी नाही.

नांदगाव : येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने पशूंचे उपचाराविना हाल होत आहेत. परिणामी दवाखान्यात शुकशुकाट दिसून येत आहे.तालुक्यातील पशुवैद्यकिय विभागाची अनेक पद रिक्त असल्याने एकाच वैद्यकिय अधिकाऱ्याला पाच पेक्षा अधिक दवाखाने सांभाळावे लागत आहेत. त्याशिवाय त्याभागात येणा-या गावांना देखील भेट द्यावी लागत असते. एकाच वेळेला अनेक दवाखाने सांभाळतांना त्यांची त्रेधा तिरपीट उडते. अशीच अवस्था पशुपालकांचीही होत आहे. नांदगांव येथे प्रथमवर्ग पशुवैद्यकिय दवाखान्यात पूर्ण वेळ अधिकारी नाही. येथे प्रभारी अधिकारी आहे. त्यांना नांदगांव ,पिंपरखेड ,पंचायत समिती विभाग,व अन्य दवाखाने बघावे लागतात. पंचायत समीती कार्यालयात पशुधन, पशुधन पर्यवेक्षक ही पदे रिक्त आहेत. येथे एकच अधिकारी आहे. ते सुद्धा प्रभारी आहेत. तालुक्यात एकूण १८ दवाखाने आहेत. त्यापैकी श्रेणी १ व दोनची ९ पदे रिक्त आहेत. सहाय्यक वर्ग अधिकाऱ्यांची १० पदे रिक्त आहेत. तसेच श्रेणी १ ला पशुधन अधिकारी ६ पदे रिक्त आहेत. पशुधन अधिकारी नसलेली गावे नांदगांव, साकोरा, हिसवळ, वाखारी, मनमाड, वंजारवाडी आदी ठिकाणी एकूण सात पदे रिक्त आहेत. येथील कारभारही प्रभारी अधिकारी बघतात. पशुधन पर्यवेक्षक १ रिक्त आहे. ७ दवाखाने राज्य शासनाकडे व ३ पंचायत समितीकडे असतात. परीचर (शिपाई ) २० पैकी ७ रिक्त आहेत.तालुक्यात सहा दवाखाने अधिकारीविना आहेत येथे फक्त शिपाई आहेत . तालुक्यतील भौरी, हिसवळ, वंजारवाडी, नांदगांव व पंचायत समिती पिंपरखेड, साकोरा मनमाड वाखारी, न्यायडोंगरी या व्यतिरिक्त १२ गावांतील पशुवैद्यकिय अधिका-यांची पदे रिक्त आहेत.अशावेळी उपचारास येणा-या प्राण्यावर उपचार कोणी करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक