शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आधी शुकशुकाट, नंतर वाढला ओघ !

By admin | Updated: September 18, 2015 23:44 IST

पर्वणी : पावसामुळे भाविकांची पहाटे तुरळक हजेरी

नाशिक : कुंभमेळ्याच्या द्वितीय पर्वणीला पहाटे चारपासूनच सुरू झालेला भाविकांचा ओघ पाहता, तिसऱ्या पर्वणीलाही प्रारंभीपासूनच गर्दी होण्याची अपेक्षा होती; मात्र पहाटे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रामकुंड परिसरात शुकशुकाटच होता. जसजसा दिवस वर चढत गेला, तसतशी भाविकांची गर्दी वाढत गेली. पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरवली. त्यानंतर प्रशासनाने बंदोबस्ताचे फेरनियोजन केल्यावर दुसऱ्या पर्वणीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आता अखेरच्या पर्वणीला नेमके काय होते, याकडे बहुतेकांचे लक्ष लागून होते; मात्र शुक्रवारी पहाटे तीनपासूनच धुव्वाधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. पर्वणीची वेळ जवळ येत होती, तसतसा पावसाचा जोर वाढतच होता. त्यामुळे शहरातील रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. पाचच्या सुमारास महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांचे रामकुंडावर आगमन झाले. याच सुमारास पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनीही सुरक्षेचा आढावा घेतला. पावसाचा जोर वाढत असल्याने मिरवणुकीची वेळ टळते की काय, याची चिंता या सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. एव्हाना पुरोहित संघाचे पदाधिकारीही गोदाघाटावर दाखल झालेले नव्हते. दुसरीकडे पावसामुळे रामकुंडात ड्रेनेजचे पाणी मिसळून दुर्गंधी तर सुटणार नाही ना, याची चिंताही महापौर, उपमहापौरांना सतावत होती. तेवढ्यात मिरवणूक सुरू होण्याच्या तयारीत असल्याचे कळताच महापौरांनी रामकुंडावरून साधुग्रामकडे प्रयाण केले. काही वेळातच मिरवणूक गोदाघाटावर दाखल झाली व हळूहळू भाविकांची संख्याही वाढू लागली. (प्रतिनिधी)