शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक मार्गाने निघणार श्रीराम रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:12 IST

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथाची येत्या मंगळवारी (दि.२७) कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने रथयात्रा काढण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. रामनवमी तसेच रथोत्सव मोठ्या उत्साहात तसेच शांततेत साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

पंचवटी : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथाची येत्या मंगळवारी (दि.२७) कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने रथयात्रा काढण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. रामनवमी तसेच रथोत्सव मोठ्या उत्साहात तसेच शांततेत साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, प्रभाग समिती सभापती प्रियंका माने, सरकारवाडा पोलीस निरीक्षक अशोक भगत, गुन्हे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, वीज वितरण कंपनीचे पद्माकर हटकर आदी उपस्थित होते. रामनवमी तसेच श्रीराम व गरुड रथयात्रा असल्याने या दिवशी भाविकांनी विशेषत: रथोत्सव समितीच्या सदस्यांनी काय उपाययोजना करावी यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी झालेल्या बैठकीत राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रथातील मूर्तीचे दर्शन घ्यावे, परंतु रथावर चढू नये, रथोत्सव मार्गावर रथ ओढणाºयांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रथावर रथोत्सव समितीच्या वतीने नेमलेल्या सदस्यांनी थांबावे, ढोल पथकाची संस्था कमी करावी तसेच रथोत्सव दिवशी रामकुंडात देवाला अवभृत स्नान घातले जात असल्याने गोदावरी नदीला वाहते पाणी सोडावे, गाडगे महाराज पुलाखाली विद्युत व्यवस्था करावी आदी सूचना मांडण्यात आल्या. या बैठकीला रघुनंदन मुठे, राकेश शेळके, देवांग जानी, नितीन शेलार, सचिन डोंगरे, उमापती ओझा, छोटूसिंग भोईर, धनंजय पुजारी, रावसाहेब कोशिरे, अमित भोईर, नंदू पवार, पद्माकर पाटील, अविनाश दीक्षित, लक्ष्मण धोत्रे, प्रतीक गवळी, बाळू गवळी, श्याम पिंपरकर, सुनील फरताळे, किरण पानकर, महेश महंकाळे, मुकुंद गांगुर्डे, किशोर गरड आदींसह रास्ते आखाडा तालीम संघ, गरुड रथाचे पदाधिकारी, पाथरवट समाज पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. रथोत्सव कालावधीत शुभेच्छा फलकांवर गुन्हेगार तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे फोटो लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल तसेच रथोत्सवाच्या दिवशी रथमार्गावर वाहने आणू नये व उभी करू नये, रथमार्गावर अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कारवाई केली जाईल, असे बर्डेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक