शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र सिध्देश्वरचा यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 15:40 IST

अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशिवकुंडात सचैल स्नान करून भगवान महादेवाची आराधना करतात.

अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी रद्द करण्यात आला आहे.कळवण तालुक्याच्या दुर्गम आदिवासी पट्टयातील पुनंद खोऱ्यात पुनंद नदिकाठी भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन असे अतिप्राचीन शिवमंदिर आहे. येथे शेकडो वर्षापासून भगवान शंकराच्या उपासनेतील महाशिवरात्री उत्सवानिमित्त येणारे हजारो भाविक मंदिरालगतच्या शिवकुंडात सचैल स्नान करून भगवान महादेवाची आराधना करतात.                             या एकदिवसीय यात्रे नंतर याच स्थळी होळी पौर्णीमे पर्यंत तीन दिवस मोठी यात्रा भरते.यात्रेत कोटयावधी रूपयांची उलाढाल तर होतेच मात्र,अनेक वर्षापासून या पंचक्रोशितील आदिवासी बांधवांमध्ये या यात्रेत सग्यासोयऱ्यांना आमंत्रित करत उपवर वधु-वरांच्या पसंतीने सोयरिक जमविण्याची एक अनोखी प्रथा यात्रेचे खास वैशिष्ट आहे.मात्र असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा दिनांक ११मार्च रोजीचा शिवरात्रोत्सव तसेच दिनांक २८मार्चला होळीनिमित भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस आणि देवस्थान यांनी घेतला आहे.मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने उलाढाल ठप्प होणार आहे.यात्रा ही रद्दश्रीक्षेत्र देवळीकराड, श्रीक्षेत्र गुंदेश्वर, श्रीक्षेत्र चणकेश्वर, श्रीक्षेत्र देसगांव यासह तालुक्यात इतरही क्षेत्री महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर