शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी,गंगापुत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:20 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड. श्रीकांत प्रभाकर गायधनी व श्याम माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली. आज सर्व म्हणजे १६ नगरसेवक, उपनगराध्यक्ष असे १८ जण उपस्थित होते. आता यापुढे पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्य संख्या २० झाली आहे.

ठळक मुद्देत्र्यंबक नगरपालिका : विशेष सभेत निवडआज फक्त नगराध्यक्षांनी औपचारिकरीत्या नियुक्तीचा आदेश सभागृहात वाचून दाखविला

त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड. श्रीकांत प्रभाकर गायधनी व श्याम माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली.आज सर्व म्हणजे १६ नगरसेवक, उपनगराध्यक्ष असे १८ जण उपस्थित होते. आता यापुढे पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्य संख्या २० झाली आहे. या नियुक्तीचे भाजपा नेते भावेश शिखरे, माधवराव भुजंग, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, माजी गटनेते रवींद्र सोनवणे, नगरसेवक अनिता बागुल, सागर उजे, आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, कैलास नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल फडके आदींनी स्वीकृत नगरसेवक निवडीवर मनोगत व्यक्त केले. श्याम गंगापुत्र हे शहर भाजपाचे अध्यक्ष असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे अनेक उपक्रम राबवून पक्षकार्य वाढविले.पक्ष काम करीत असताना पालिका निवडणूक लागली. तर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष असलेले अ‍ॅड. श्रीकांत गायधनी हे व्यवसायाने वकील असून, त्यांना पालिकेच्या दैनंदिन कामाचा चांगला अनुभव आहे. गायधनी हे गावातील याज्ञवल्क्य सभागृह, लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. यावेळी मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, कार्यालयीन अधीक्षक अरुण गरुड, संजय मिसर आदी उपस्थित होते. केवळ औपचारिकता... पालिकेची निवडणूक झाल्यानंतर नागरिकांना प्रतीक्षा होती ती स्वीकृत नगरसेवक निवडीची. पण सन १९६५ नगरपालिका अधिनियमात नवीन तरतूद करून स्वीकृत नगरसेवक निवड ऐवजी नगराध्यक्षांनी नियुक्ती करून करावयाची आहे. त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेत भाजपाला निर्विवाद एकतर्फी यश मिळाल्याने पालिकेची सूत्रे आता पक्षाच्या हाती आहेत. त्यामुळेच पक्षाकडूनच स्वीकृत नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यात आली. अर्थात ती सर्वांनाच ठाऊक होती. आज फक्त नगराध्यक्षांनी औपचारिकरीत्या नियुक्तीचा आदेश सभागृहात वाचून दाखविला.