शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

श्री संप्रदायाचा पारायण सोहळा

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

श्री संप्रदायाचा पारायण सोहळा

सिन्नर : रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या तालुका सेवा समितीच्या वतीने आयोजित लीलामृत ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात पार पडला.येथील शुभंकरोती मंगल कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष श्रीमती अश्विनी देशमुख, अ‍ॅड. अण्णासाहेब सोनवणे, अ‍ॅड. शिवराज नवले, सेवा समितीचे जिल्हा सचिव जालिंदर थोरात, अध्यात्मिक विभाग प्रमुख राजेंद्र भालेराव आदि उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराजलिखित २१ अध्याय असलेल्या लीलामृत ग्रंथाचा एक दिवसाचा पारायण आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. सेवा समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी तालुका सेवा समितीचे शरद वराडे, महिला तालुका सेवाध्यक्ष शांताबाई आव्हाड, प्रसिद्धीप्रमुख उत्तम बिडगर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)