शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:07 IST

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही चिंता

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी महिलांच्या सन्मानाचे उत्सवी उपचाराचे सोहळे साजरे न करता एकूणच स्त्रीचे अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान जपण्याचे व तो अधिकाधिक वृद्धिंगत कसा होईल याची काळजी समाजाने वाहण्याची गरज प्रतिपादीत केली. कृष्णाई मंगल कार्यालयात अग्रवाल, बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती शीतल कोर, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त निलेश चव्हाण व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्नेहलता नेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना अग्रवाल यांनी महाराष्टÑ ही राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या धुरिणींची भूमी आहे. त्यांचा समर्थ वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून समाजातील वाढत्या भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत सखी मंचच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्र माचे आयोजन केले होते.या स्पर्धेत नामपूरच्या होम मिनिस्टरचा मान यामिनी सावंत यांनी पटकावला. त्यांना अग्रवाल यांच्या हस्ते पैठणी साडीची भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्रीहरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद नेरकर,पूनम कोकणे , पूनम सोनवणे , नामपूरच्या उपसरपंच मंगला सावंत , संतोष सावंत, पांडुरंग सावळा, प्रकाश अहिरे , पूनम खरोटे ,सुनिता पाटील, समीना बोहरी, मयुरी शिरापुरे , सीमा बधान ,आशादेवी वाघ, पुष्पा मुथा, सोनाली निकम ,दिपाली चव्हाण ,मालती अग्नीहोत्री ,करुणा अलई ,प्रियंका अलई, योगिता सोनवणे यांच्यासह हजार ते अकराशे महिला उपस्थित होत्या.तेरा महिलांचा झाला सन्मान...सुनिता पाटील (स्मशानभूमी सेविका नाशिक), पूनम राऊत (पोलीस निरीक्षक दामिनी पथक), पार्वताबाई शंकर येवले (जीवन गौरव पुरस्कार नाशिक),अलींनी दीदी ,प्रजापिता ब्रम्हकुमारी ; चंद्रभागा धोंडीराम भोई (कृतीशील सरपंच, तळेगाव दिंडोरी), प्रियंका अभिजित बागड (अध्यक्ष रोटरी क्लब सटाणा), मनीषा राहुल खरे (अंगणवाडी सेविका, खमताणे), सुनंदा बाजीराव भामरे (माध्यमिक शिक्षिका, नामपूर), अलका किसनसिंग परदेशी (सेवाभावी अध्यापिका,नाशिक), लता बळीराम महाले (सेवाभावी मुख्याध्यापिका, नामपूर) कविता बळवंत सावंत (सरपंच ,नामपूर), इंदुबाई चिला अहिरे (कृतीशील कृषीकन्या टेंभे) मंगल भिका शिरोळे (लिपिक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, नामपूर)भावस्पर्शी नाटकब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या महिलांनी ‘स्रीभ्रुण हत्या’ या विषयावर सादर केलेल्या नाटिकेला उपस्थिांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी तळेगाव विद्यालयाच्या बाल सावित्री पायल चौधरी ,वैष्णवी चौधरी, धनश्री ढाकणे या विद्यार्थीनींनी ‘महिला अबला की सबला?’ या विषयावर व्यक्त केलेल्या मनोगताला उत्स्फूर्त दाद मिळाली.