अंदरसूल : येवला तालुक्यातील देवठाण-भायखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने देव नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी लाभ होण्यास मदत होणार आहे. या भागातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळेस टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. या बंधाऱ्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी सरपंच मीराबाई जानराव, उपसरपंच गीताबाई डुमरे, ग्रामपंचायत सदस्य अरु ण देवरे, अर्चना खिल्लारे, उषाबाई लावरे, लंकाबाई सोमसे, गोविंद जाधव, बाळू सोमासे, बाळू जाधव, नामदेव जानराव, सखाराम वाघ, साहेबराव वाघ, किशोर वाघ, बाबासाहेब जानराव, चन्द्रभान साळुंके उपस्थित होते.(वार्ताहर)
वनराई बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान
By admin | Updated: October 27, 2015 23:25 IST