शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

सप्तश्रृंगगडावर श्रमदान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:28 IST

सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.

ठळक मुद्देनवरात्रोत्सव : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदारांचा सहभाग

कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागल्याने पर्यावरण रक्षण व जनजागृती करण्यासाठी शासनाच्या निर्णयाला साथ सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतने प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा ठरावच ग्रामसभेत संमत करण्यात आला असून प्लास्टिक आढळल्यास अथवा वापरल्यास ५०० ते ५००० रु पये दंड आकारण्यात येत आहे. एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, परिसर स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी बाबत संपूर्ण पाहणी केली. यावेळी पहिल्या पायरी लगतच आडोशाला ग्रामपंचायतीच्या एका भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसल्याने त्यांनी स्वत: साफसफाई करण्यास सुरु वात केली. यावेळी उपस्थित कळवणचे तहसीलदार बी. एन. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम व सुरगाणा तहसीलदार सूर्यवंशी यांनी श्रमदानास सुरु वात केली. सलग दोन तास श्रमदान करीत सरपंच, सदस्य, कळवण पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामस्थ व कर्मचारी आदींनी जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा गोळा करीत श्रमदान केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी शुद्धीकरण, तलाव स्वच्छता व परिसर स्वच्छता याबबत प्रत्येक्ष भेट देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना केल्या.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदsaptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर