सिन्नर : सनईच्या मंगल सुरांनी मंतरलेल्या वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १३ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला!सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पंचवटी हॉटेलच्या मंत्रालय सभागृहात आयोजित ‘पानसुपारी’ समारंभास शेकडो सिन्नरकर सहर्ष उपस्थित राहिले. ‘लोकमत’वरील आपला स्नेह प्रकट करीत शब्दसुमनांनी अलकृंत झालेल्या भावनांचा वर्षाव करताना ‘लोकमत’शी असलेले स्नेहबंध अधिक गहिरे करण्याचे अभिवचनही सिन्नरकरांनी दिले.वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘अशी केली मात’ या शंभर पानी विशेषांकाचे यावेळी सर्वांनी मन:पूर्वक कौतुक केले. या समारंभास ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, लालाशेठ चांडक, सुदामशेठ सांगळे, ैत्र्यंबकबाबा भगत, कॅप्टन अशोककुमार खरात, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, जिल्हा परिषद सदस्य राजेश नवाळे, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, रामदास खुळे, निफाड विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोतीलाल वसावे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, माउली फाउंडेशनचे संस्थापक अजय दराडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल बलक, डॉ. विष्णू अत्रे, सिटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, स्टाईसचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडितराव लोंढे, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, नवनियुक्त आयएएस अधिकारी रवींद्र खताळे, रत्नाकर पवार, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, नगरसेवक बापू गोजरे, हर्षद देशमुख, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय जाधव, नगरसेवक मनोज भगत, शैलेश नाईक, प्रमोद चोथवे, सोमनाथ पावसे, नामदेव शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, वावीचे उपसरपंच विजय काटे, दुय्यम निबंधक इंद्रवर्धन सोनवणे, बाळासाहेब चकोर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, पद्माकर गुजराथी, दीपक बर्के, अनिल सांगळे, डॉ. विजय लोहारकर, डॉ. अशोक सोनवणे, डॉ. गणेश सांगळे, नवनाथ मुरडनर, गो. स. व्यवहारे, विक्रम कातकाडे, कैलास क्षत्रिय, सुधीर रावले,वामनराव गाढे यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, बँकिंग,शिक्षण आदि क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपल्या सदिच्छा दिल्या. (वार्ताहर)
‘लोकमत’वर स्नेहशुभेच्छांचा वर्षाव
By admin | Updated: July 26, 2016 00:58 IST