शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ वर स्नेह शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:32 IST

सिन्नर : मंगलमय वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

ठळक मुद्दे‘स्मार्ट सिटी स्मार्ट सिटिझन’: सिन्नर विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात

सिन्नर : मंगलमय वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित ‘पानसुपारी’ समारंभास शेकडो सिन्नरकर सहर्ष उपस्थित राहिले. ‘लोकमत’वरील आपला स्नेह प्रकट करीत शब्दसुमनांनी अलकृंत झालेल्या भावनांचा वर्षाव करताना ‘लोकमत’शी असलेले स्नेहबंध अधिक गहिरे करण्याचे अभिवचनही सिन्नरकरांनी दिले.वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ ने प्रकाशित केलेल्या ‘स्मार्ट सिटी स्मार्ट सिटिझन’ या विशेषांकाचे यावेळी सर्वांनी मन:पूर्वक कौतूक केले. या समारंभास ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, सुदामशेठ सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, संचालक अनिल सांगळे, सचिव विजय विखे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी. एन. नाकोड, राम हरदास गुरुजी, उद्योजक विवेक चांडक, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष युनूस शेख, नारायण वाजे, अरुण वारुंगसे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, वावी पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, उपनिरीक्षक विकास काळे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, डॉ. विष्णू अत्रे, डॉ. विजय लोहारकर, सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, पद्माकर गुजराथी, स्टाईसचे अध्यक्ष पंडीत लोंढे, नामकर्ण आवारे, बाबासाहेब दळवी, अविनाश तांबे, रामदास दराडे, सुनील कुंदे, नगरसेवक पंकज मोरे, नगरसेवक सोमनाथ पावसे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, विजय जाधव, शीतल कानडी, मल्लू पाबळे, सुजाता भगत, निरुपमा शिंदे, युवक कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिनेश चोथवे, मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे, मुख्याध्याक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, दीपक बर्के, आनंदराव शेळके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हांडे, कस्तुरी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास क्षत्रिय, उद्योजक किशोर राठी, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. भूषण वाघ, डॉ. जी. एल. पवार, डॉ. आर. आर. बोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष चैतन्य कासार, वैभव मुत्रक, लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, खरेदी विक्रीस संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊसाहेब तांबे, उपाध्यक्ष नीशा वारुंगसे, गोदा युनियन कृषक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव सांगळे, सिन्नर महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, सुनील तोमर, बॅँक आॅफ महाराष्टÑचे शाखा व्यवस्थापक विशाल वाघ, टीजीएसबी बॅँकेचे विवेक बकरे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, युवक राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, शिक्षक नेते अंबादास वाजे, मोहचे सरपंच सुदाम बोडके, पाडळीचे सुभाष जाधव, सुभाष जाजू यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, बँकींग, शिक्षण आदि क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपल्या सदिच्छा दिल्या.‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी विभागीय कार्यालयात सौ. सविता व सचिन सांगळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. ‘लोकमत’चे सिन्नर तालुका प्रतिनिधी शैलेश कर्पे, सचिन सांगळे, कृष्णा वावधाने, योगेश ठुबे, गणेश पगार यांच्यासह लोकमत परिवाराने आभार मानले.