शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोटाला शाई दाखवा, सवलतीत चित्रपट पाहा !

By admin | Updated: February 19, 2017 01:00 IST

मतदार जागृती : दामोदर-विजयानंद थिएटरचा उपक्रम

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान करा आणि बोटाला लावलेली शाई दाखवून खुशाल दामोदर-विजयानंद थिएटरमध्ये सवलतीच्या दरात चित्रपटाचा आनंद लुटा. थिएटरचे संचालक विनय चुंभळे यांनी महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तिकीट दरात २० टक्के सवलत योजना जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नाशिक महापालिकेमार्फत त्यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत व मिसेस युनिव्हर्स नमिता कोहोक, अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांची संदेशदूत म्हणून नियुक्ती करत मतदार जागृती केली जात आहे. शहरातील विविध व्यावसायिकांनीही मतदार जागृतीच्या उपक्रमात सहभागी होत सवलत योजना जाहीर कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या दामोदर आणि विजयानंद थिएटरचे संचालक विनय चुंभळे यांनी खास सवलत योजना जाहीर केली आहे. दि. २१ फेबु्रवारीला जे नागरिक मतदान करुन चित्रपट पाहण्यास येतील, त्यांनी बोटावरील शाई दाखविल्यास चित्रपटाच्या तिकिटाच्या दरात २० टक्के सवलत दिली जाणार आहे. सदर सवलत योजना दि. २१ रोजी मतदानाच्या दिवशी चारही शोसाठी असणार आहे. प्रत्येकाने निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजवायला हवा. मतदानासाठी लोक प्रवृत्त व्हावे याकरीता आपण चित्रपटगृहांमध्ये ही सवलत योजना देत असल्याचे विनय चुंभळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठीलोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी शहरात अनेक व्यावसायिकांनी मतदान जागृतीच्या या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. आता महापालिका निवडणुकीसाठीही योग्य उमेदवार निवडून जावेत आणि प्रत्येकाला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मनपा प्रशासनामार्फत विशेष उपक्रम राबविले जात असून, व्यावसायिकांनी मतदानाच्या दिवशी नागरिकांना त्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता सवलत योजना राबवावी, असे आवाहन मनपाने केले आहे.