शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समिती सभापती चुंभळेंना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:22 IST

बाजार समितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले असून, गेल्या आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संपतराव सकाळे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजार समितीतील वाद विकोपाला

ठळक मुद्देपदावरून का काढू नये : जिल्हा उपनिबंधकांची कार्यवाहीचुंभळे व सकाळे गटात जोरदार हाणामारीही होऊन परस्पर विरोधी गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ११ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने चुंभळे यांना बाजार समितीच्या संचालकपदावरून का काढून टाकण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे सभापती चुंभळे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर चुंभळे विरोधी गटाचे ११ संचालक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

बाजार समितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले असून, गेल्या आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संपतराव सकाळे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजार समितीतील वाद विकोपाला गेला. सभापती चुंभळे यांचे अधिकार काढून घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ११ संचालकांनी चुंभळे यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी करून त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव करून तो जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला आहे. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी ११ संचालकांनी एकत्र येत सभापती चुंभळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला असून, त्यावरून चुंभळे व सकाळे गटात जोरदार हाणामारीही होऊन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीची सभापती चुंभळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यात चुंभळे यांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्य पार पाडण्यास जाणून बुजून कसूर केला असल्याने बाजार समितीच्या नुकसानीस जबाबदार धरून समिती सदस्य पदावरून आपणास का काढून टाकण्यात येऊ नये असे नमूद केले आहे. या नोटिसीवर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक