शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा निर्णय सेनेने लवकर घ्यावा : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:46 IST

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंहिता लागू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी असल्याने जो काही निर्णय असेल तो तर लवकर झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीच्या महापूजेसाठी ते आले असता यावेळी त्यांनी संवाद साधला.

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंहिता लागू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी असल्याने जो काही निर्णय असेल तो तर लवकर झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीच्या महापूजेसाठी ते आले असता यावेळी त्यांनी संवाद साधला. युतीसाठी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी केल्याच्या विषयावरून उलटसुलट दावे सुरू असून, त्याबाबत बोलताना महाजन यांनी दूरध्वनी केला किंवा नाही केला अशाप्रकारच्या अनेक अफवा निवडणुकीच्या काळात पसरत असतात. त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. परंतु काही घडलेच तर ते प्रवक्ते त्वरित सांगतील, तूर्तास युतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपाने लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मात्र जे भाजपाकडे लोकसभा मतदार संघ आहेत त्याविषयीच आढावा घेण्यात आल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. स्वामीनाथन आयोग असो किंवा अन्य विषय असो, त्यांच्या अनेक मागण्या कार्यवाहीत आहेत. लोकआयुक्त नेमण्याच्या दिल्लीतील कामकाज अंतिम टप्प्यात आहे. निवड समितीचा प्रश्नदेखील सोडविण्यात आला आहे. लोकायुक्त नियुक्तीचा विषय बाकी असला तरी पंधरा दिवसांत हेही काम पूर्ण होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे यासंदर्भातील पत्र घेऊन हजारे यांची पुन्हा भेट घेऊ, असेही महाजन म्हणाले. हजारे यांच्या आणि त्यांच्या टीमच्या संपर्कात आपण आहोत आणि चर्चाही करीत आहोत. हजारे यांच्या वयाला आणि तब्येतीला आंदोलन मानवणारे नाही, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.