शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

झोडगेत सायकलपटू अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:09 IST

  लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : लहानपणापासून अनेक छंद जडलेले असतात. छंदापायी अनेक जणांचा नावलौकिक वाढतो; तर हाच छंद कुणाचा जीवही घेणारा ठरतो, असाच काहीसा प्रकार धुळ्यातील सायकलपटूबाबत घडला. धुळ्याहून चांदवडला सायकलने देवीदर्शनाला येताना ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलपटूला जीव गमवावा लागला.धुळे येथील हौशी व अनेकांना मार्गदर्शन करणारे गिर्यारोहक मंगेश एकनाथ वडगे (५४) ...

ठळक मुद्देट्रकची धडक : मंगेश वडगे धुळ्याचे रहिवासी

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : लहानपणापासून अनेक छंद जडलेले असतात. छंदापायी अनेक जणांचा नावलौकिक वाढतो; तर हाच छंद कुणाचा जीवही घेणारा ठरतो, असाच काहीसा प्रकार धुळ्यातील सायकलपटूबाबत घडला. धुळ्याहून चांदवडला सायकलने देवीदर्शनाला येताना ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलपटूला जीव गमवावा लागला.धुळे येथील हौशी व अनेकांना मार्गदर्शन करणारे गिर्यारोहक मंगेश एकनाथ वडगे (५४) यांचा रविवारी सकाळी झोडगे गावानजीक ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला.मूळचे मालेगावचे रहिवासी असलेले मंगेश वडगे व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून धुळे येथे स्थायिक झाले होते. त्यांचे वडील एकनाथ वडगे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. काही वर्षे नाशिकमध्ये ते नोकरीनिमित्त मुक्कामी होते. त्यावेळी मंगेश यांचे माध्यमिक शाळेतील शिक्षण नाशकात झाले होते. त्यांचे मोठे बंधू नाशकात स्थायिक आहेत. मंगेश वडगे यांचा मुलगा गौरव हा इंडोनेशियात नोकरी करतो. गौरव हा राष्ट्रीय पातळीवर ट्रायथलॉन खेळाडू आहे. धावणे, पोहणे व सायकल चालविणे हे तीन खेळ एकाचवेळी खेळल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन या खेळात हैदराबाद येथे त्याने साडेसात तास सलग ट्रायथलॉन करून राष्ट्रीय पातळीवर रेकॉर्ड केले होते. तर मुलगी कावेरी ही नाशिकला इंजिनिअरिंग करीत आहे. धुळे येथील नगरपट्टी भागात कावेरी वॉच कंपनी या नावाने मंगेश वडगे घड्याळ दुरुस्ती व विक्रीचे दुकान चालवित असत. सायकलद्वारे अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या. रोज किमान ४० किमी सायकलिंग ते करीत असत. हा छंदच त्यांना मृत्यूच्या दाढेत घेऊन जाणारा ठरला. वडगे रविवारी (दि. २६) पहाटे सायकलवरून चांदवड येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येण्यासाठी मित्रांसोबत निघाले.या घटनेने नाशिकसह मालेगाव व धुळे येथील मित्रपरिवारावर मोठा आघात झाला. त्यांनी मनाली ते लेह असा खडतर ५५० किमीचा व धुळे ते सुरत असा ६०० किमीचा टप्पा सायकलद्वारे पार केला होता. गिर्यारोहण व जलतरणाचीही त्यांना आवड होती. अनेक तरुणांना, विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले होते. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. संगमेश्वर येथील माधवराव पूरकर यांचे ते जावई होत. एका सायकलपटूचा सायकल मोहिमेतच मृत्यू व्हावा या घटनेने दु:ख व्यक्त होत आहे. सोमवारीत्यांच्यावर धुळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.