शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

साईनाथनगरला ४१ दुकाने जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:29 IST

साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही.

ठळक मुद्देन्यायालयाने स्थगिती न दिल्याने कार्यवाही

नाशिक : साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही.साईनाथ चौफुली लगत सर्व्हे नंबर ८६७/पै. या खासगी जागेत ही दुकाने होती. काही दुकाने फर्निचर, तर काही गॅरेज आणि कपडे अशा विविध व्यावसायिकांची होती. महापालिकेने २०१५-१६ मध्ये या व्यावसायिकांना नोटिसा दिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.व्यावसायिकांनी मागितली जिल्हा न्यायालयात दादन्यायालयाने सदरची बेकायदेशीर बांधकामे नियमित करायची असेल तर नगररचना विभागाकडे अर्ज करण्यास सांगितले त्यानुसार संबंधितांनी अर्ज केले. मात्र प्रचलित नियमांना धरून ते नसल्याने नगररचना विभागाने सर्व प्रस्ताव नाकारले. त्यानंतर महापालिकेने गेल्यावर्षी जून महिन्यात संबंधितांना बांधकामे हटविण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली. दरम्यान, संबंधित व्यावसायिकांनी तातडीने पुन्हा जिल्हा न्यायालयात दाद मागितली. परंतु गुरुवारी (दि.१७) झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांना स्थगिती मिळाली नाही. हीच संधी साधत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी तडक शुक्रवारी कारवाई केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण