शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने डाळींब बागेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:12 IST

उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रमेश दामु सावंत यांच्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रमेश दामु सावंत यांच्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचे सुमारे पंचवीस टन डाळींबाचे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा यावर्षीही शार्टिसर्कटमुळे डाळींब बाग जळाल्याने सदर शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरता हतबल झाला आहे. खारिपाडा (महात्माफुलेनगर) शिवारात डोंगरगाव येथील शेतकरी रमेश सावंत यांनी साडेतीन हजार डाळींब आण िसुमारे एक हजार आवळा झाडांची फळबाग फुलविली आहे. शेतालगत असलेल्या वन्या ओहळच्या आजुबाजुला काटेरी झुडुपे आहेत. झुडुपांवरु न वीजेच्या तारा गेलेल्या आहेत. वीजेच्या तारांना झोल पडल्यामुळे वारा व पक्षांच्या हालचालीने शॉर्टसर्किट होऊन डाळींबाची साठ - सत्तर झाडे आगीने होरपळून गेली आहे. प्रसंगावधानाने शेजारील शेतकरी बांधवांनी आग विझवुन बाकीची बाग वाचवली आहे.डोंगरगाव भागातील विद्युतवाहक तारा लोंबकळतांना दिसतात.विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुमारे छत्तीस लाखाचे नुकसान झाले परंतु विजवितरण कंपनीने केलेल्या चुकीच्या पंचनामामुळे या शेतकर्याला अद्यापही एक दमडीची नुकसान भरपाई मिळाली नाही. घटनास्थळी भेट न देता संबंधित लखमापुर, सटाणा विजवितरण कार्यालयाने परस्पर व चुकीचा पंचनामा करु न नुकसान भरपाईपासुन वंचित ठेवल्याचा आरोप शेतकरी सावंत यांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक