शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:33 IST

शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.

नाशिक : शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.  नाशिक महानगरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सफाई कामगारांची संख्या १९३३ इतकी असून, शहरातील स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढत चाललेला असून, त्यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुहे उर्वरित सफाई कामगारांवर चार हजार सफाई कर्मचाºयांचा कामाचा बोजा वाढणार आहे. इतकी कमी कर्मचाºयांमध्ये शहराची स्वच्छता होणे अशक्य आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छतेमुळे चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया वैगेरे आदी आजार होऊ शकतात. मागील महासभेत सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडून सफाई कामगार आउट सोर्सिंग भरतीला तीव्र विरोध करण्यात आला.  वास्तविक राज्य शासन अन्य ठिकाणी शासकीय आदेशानुसार सफाई कामगारांच्या भरतीमध्ये मेहतर वाल्मीक समाजाला प्राधान्य देत आहे. परंतु नाशिक महापालिका सफाई कामगार भरतीला परवानगी देत नाही. त्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे.  निवेदनावर नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल बेग, दीपक चंडालिया, जयेश बहारे, ईश्वर गहलीत, साई उमरवाल आदींच्या स्वाक्षºया असून, सदर निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती नाही नाशिक महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती झालेली नाही. मागील कुंभमेळ्यात सफाई कामगारांची आवश्यकता होती. परंतु प्रशासनाने भरती न करता सफाई काम ठेकेदार पद्धतीने करण्यात येते. वास्तविक पाहता मेहतर वाल्मीकी समाज वंश परंपरागत शासन सेवेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे.