शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या उत्सवात बिअरची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:08 IST

उत्पादन शुल्क विभागाने बिअरच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिअरचे उत्पादन कंपन्यांनी कमी केले आहे. त्याचा फटका विक्रेते आणि ग्राहकांनादेखील बसत असून, बाजारात बिअरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उत्सवाच्या काळात बिअरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

नाशिक : उत्पादन शुल्क विभागाने बिअरच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिअरचे उत्पादन कंपन्यांनी कमी केले आहे. त्याचा फटका विक्रेते आणि ग्राहकांनादेखील बसत असून, बाजारात बिअरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उत्सवाच्या काळात बिअरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच सौम्य तसेच मायक्रोबिअरच्या निर्मितीलाच कराचा फटका बसल्याने हौस म्हणून किंवा सेलिब्रेशन म्हणून सौम्य बिअर पिणाºयांना यंदा त्यांची मनपसंत बिअर मिळणे कठीण होणार आहे. बाजारात सध्या सौम्य बिअर उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे हौशी तरुण-तरुणींना स्ट्रॉँग बिअरची आॅफर करणाºयांपासून सावध रहावे लागणार आहे.  उत्पादन शुल्क विभागाने लादलेल्या करामुळे महिनाभरापासून बिअर कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्याची अडचण फारशी समोर आलेली नव्हती, मात्र आता नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात बिअरला मागणी वाढल्यानंतर तुटवड्याचा परिणाम समोर आला आहे. बिअर शॉप, हॉटेल्समध्ये बिअर मिळणे मुश्कील असून, काही ठराविक एक-दोन ब्रॅन्ड वगळता अन्य बिअर मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. हॉटेल व्यावसायिकांना प्रतीक्षा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बिअरची उपलब्धता होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना या दिवसातही बिअरचा पुरेसा पुरवठा होणार नसल्याचे शहरातील काही हॉटेल्स संचालकांचे म्हणणे आहे. उत्पादन शुल्क कराच्या अटींमुळे बिअर कंपन्यांनी सौम्य बिअरची निर्मिती कमी केली आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांनी बिअर उत्पादनात कपात केल्यामुळे यंदाच्या नववर्षात अनेकांचा हिरमोड होणार आहे.

टॅग्स :New Yearनववर्ष