शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शॉपिंग सेंटर, सलून बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:55 IST

नाशिक : अटी-शर्तींच्या अधीन राहून रेड झोनमधील दुकाने उघडली जाणार असून, शहरातील मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि सलून मात्र बंदच राहणार आहे. दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी डिस्टन्स नियमांचे पालन झाले नाही तर प्रसंगी सवलत रद्द होण्याची नामुष्कीदेखील येऊ शकते.

नाशिक : अटी-शर्तींच्या अधीन राहून रेड झोनमधील दुकाने उघडली जाणार असून, शहरातील मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि सलून मात्र बंदच राहणार आहे. दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी डिस्टन्स नियमांचे पालन झाले नाही तर प्रसंगी सवलत रद्द होण्याची नामुष्कीदेखील येऊ शकते. नागरिकांनी लागलीच एकाचवेळी बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.नाशिक महापालिका क्षेत्र हे रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे नाशिककरांची जबाबदरी मोठी आहे. शासनाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार येथील दुकानांबाबत काहीशी शिथिलता दिली आहे, मात्र सुरक्षिततेचे नियम मात्र बंधनकारक करण्यात आले आहे.नाशिक रेडझोनमध्ये असले तरी सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी तूर्तास नाकारली आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर मात्र खुले होणार नाही. शॉपिंग सेंटरमध्ये पाचपेक्षा अधिक दुकाने असतील तर असे शापिंग सेंटर खुले होणार नाही. मात्र त्यात अत्यावश्यक सेवेची दुकाने असतील तर ती मात्र खुली होतील. ज्या शॉपिंग सेंटरमध्ये पाचच दुकाने आहेत ती पाचही दुकाने सुरू होऊ शकतील. जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता सराफा व्यावसायिक, कापड दुकाने, सलूनची दुकाने मात्र बंदच राहणार आहेत. दुकानांबाहेर पाचपेक्षा अधिक ग्राहक उभे राहणार नाही याची काळजी दुकानदारांनी घेणे अपेक्षित आहे. नाशिककरांना कामावर जाता येईल, मात्र दुचाकीवर एकच म्हणजे पाठीमागे कुणीही नको असा नियम करण्यात आलेला आहे. चारचाकी वाहनात मागच्या सीटवर दोनच व्यक्ती असाव्यात, येत्या १७ पर्यंत कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजे बाधित रुग्ण आढळल्यानंतर जो भाग कंटन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे अशा भागात नव्याने कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. या झोनमधील दुकाने हे बंदच राहणार असून, अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली असतील.--------------बारा तास दुकाने उघडी राहणारमालेगावात ५५ कंटन्मेंट झोन आहेत. आॅरेंज झोनमध्ये दुकाने पूर्वीप्रमाणेच खुली राहाणार आहेत. आॅरेंज झोनमधील व्यक्ती परजिल्ह्यात, राज्यात जाऊ शकते. जिल्ह्यातील आठ तालुके आॅरेंज झोनमध्ये आहेत. पूर्वीच्या आदेशाप्रमाणेच सकाळी ७ ते रात्री ७ यावेळेत येथील दुकाने सुरू राहणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक