शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानात जबरदस्ती घुसून दुकानदारास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:08 IST

कुरापत काढून पाच संशयितांनी बळजबरीने दुकानात घुसून दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास मुक्तिधामजवळील कॉटन क्लब दुकानात घडली़ याप्रकरणी पाच संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : कुरापत काढून पाच संशयितांनी बळजबरीने दुकानात घुसून दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास मुक्तिधामजवळील कॉटन क्लब दुकानात घडली़ याप्रकरणी पाच संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तमंदिर परिसरातील सुशील सुराणा यांचे रेजिमेंटल प्लाझाजवळ कॉटन क्लब नावाचे दुकान आहे़ शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुराणा यांनी दुकानाच्या समोर त्यांची गाडी पार्क केली होती़ याचा संशयित गिरीश मुदलीयार यास राग आल्याने त्याने कुरापत काढून सुराणा यांना शिवीगाळ व दमदाटी केली़ यानंतर रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास मुदलीयार याने आपले साथीदार कमल कलिया मूर्ती, विशाल कुलथे, महेंद्र अहिरे व श्रीकांत शाहीर यांना बोलावून घेत बळजबरीने दुकानात प्रवेश केला व आरडाओरड करून शिवीगाळ करून आमच्या नादी लागू नको असे म्हणून दमदाटी केली़ या प्रकरणी सुशील सुराणा यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मुदलीयारसह पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, फिर्यादी सुराणा यांनी न्यायालयात संशयित व आपली चांगली ओळख असून, वाद शमल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. संशयितांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय