पंचवटी : पंचवटी परिसरात रस्त्यावर अडथळा ठरणाºया तसेच विनापरवाना दुकानांसमोर उभारलेले पत्र्याचे शेड व रस्त्यावरील टपºया, हातगाड्या हटविण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने शनिवारी (दि. ३) करण्यात आली. दिंडोरी नाका, चौफुली येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. निमाणी बसस्थानकाबाहेरील हातगाड्या, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, रस्त्यावर असलेल्या हातगाड्या, टपºया तसेच दुकानासमोरील पत्र्यांचे अनधिकृतपणे उभारलेले शेड जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काढण्यात आले. अतिक्रमण विभागाच्या वतीने ५ हातगाड्या, १५ टपºया आदी साहित्य जप्त करण्यात आले. दुपारी १२ वाजता या कारवाईला सुरुवात झाली. या मोहिमेत पंचवटीचे विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे ५0 कर्मचारी, तसेच जेसीबी यंत्र व वाहनांचा समावेश होता. मनपाच्या वतीने निमाणी बसस्थानक ते आडगाव नाका दरम्यान अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणार असल्याची माहिती मिळताच दुकानदारांनी स्वत: पत्राचे शेड व फलक काढून घेतले.
दुकानाचे शेड, टपºया हटविल्या पंचवटी : अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हातगाड्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:58 IST
पंचवटी : दुकानांसमोर उभारलेले पत्र्याचे शेड व रस्त्यावरील टपºया, हातगाड्या हटविण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने करण्यात आली.
दुकानाचे शेड, टपºया हटविल्या पंचवटी : अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हातगाड्या जप्त
ठळक मुद्दे५ हातगाड्या, १५ टपºया आदी साहित्य जप्तजेसीबी यंत्र व वाहनांचा समावेश