शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! आठ महिन्यांच्या बाळाने खेळताना गिळले नेलकटर; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून वाचवला जीव

By अझहर शेख | Updated: September 20, 2022 13:36 IST

Nashik News: नाशिकरोड येथील शिंदे कुटुंबातील चिमुकल्याने सोमवारी दुपारी घरात खेळताना नेलकटर गिळले होते. ही धक्कादायक बाब बाळाच्या आईच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले.

- अझहर शेखनाशिक  - येथील नाशिकरोड भागातील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाने घरात खेळताना हाती लागलेले नेलकटर चक्क गिळले. बाळाला त्रास होऊ लागल्याची  बाब वेळीच आईच्या लक्षात आल्याने तातडीने बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथे तपासणी केल्यानंतर तेथून आडगाव येथील मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सोमवारी (दि.१९) रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी यशस्वीपणे सुरक्षित नेलकटर बाहेर काढले.

नाशिकरोड येथील शिंदे कुटुंबातील चिमुकल्याने सोमवारी दुपारी घरात खेळताना नेलकटर गिळले होते. ही धक्कादायक बाब बाळाच्या आईच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. वैद्यकीय महाविद्यालयात उशिरापर्यंत चाललेल्या अत्यंत अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.  कुटुंबातील सदस्यांच्या विंनतीमुळे बाळाचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे. 

जिल्हा रुग्णालयाची असमर्थताजिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिकरोडचे हे कुटुंब बाळाला घेऊन सर्वप्रथम आले होते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्गाने तपासणी केली असता शस्त्रक्रिया अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथून मुलाला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय कुटुंबातील प्रमुखांनी घेतला. तेथे रात्री यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाळाच्या घशात अडकलेले नीलकटर काढण्यात डॉक्टरांना यश आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी अशा गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली यामुळेआश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक