शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई रिटर्नचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:03 IST

निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.

ठळक मुद्देनिफाडकरांची वाढली चिंता; तालुक्यातील रुग्णसंख्या १५ वर

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तरीही तालुक्यात आजमितीस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांत ओझर, विष्णुनगर, उगाव, सुकेणे येथे आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईवरून आले असल्याने निफाडकरांनी या मुंबईकरांचा चांगलाच धसका घेतलाआहे.नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आढळून आला होता.त्यानंतर मात्र त्याच्या संपर्कातील सर्वच रु ग्ण निगेटिव्ह आल्याने मोठी काळजी मिटली होती.त्यानंतर आढळून आलेलेपॉझिटिव्ह रुग्ण लासलगाव परिसरातच वेगवेगळ्या गावांमध्ये निघाले.तालुक्यातील दुसºया भागात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हते. त्यामुळे प्रशासनास काम करताना अगदी सोपे जात होते तसेच नागरिकही काळजीत नव्हते; मात्र चार दिवसांपूर्वी ओझर येथे आढळून आलेला रुग्ण, दुसºया दिवशी सुकेणे येथे आढळून आलेला रुग्ण हे दोघे मुंबई येथे बँकेत कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.सदर रुग्ण घरी आल्यानंतर आजारी पडला. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले. त्यानंतरउगाव येथे आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्णही मुंबईवरूनआला आहे, तर विष्णुनगर येथे आढळून आलेला रुग्णाचेसुद्धामुंबई कनेक्शन आहे. त्यामुळेनिफाड तालुक्यात मुंबईवरून आणखी किती नागरिक निफाड तालुक्यात आले आहेत, यावर प्रशासनातही खल सुरू झालाआहे.मुंबईहून येणाऱ्यांना रोखानिफाड तालुक्यातील अनेक लोक वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक लोक खेड्याकडे येत आहेत. येताना मात्र योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जात नसल्यामुळे ते इकडे आल्यानंतर आजारी पडतात आणि पर्यायाने त्यांना कोरोना रोगाची लागण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईहून येणाºयांना रोखावे अथवा त्यांची तातडीने तपासणी करुन त्यांना क्वॉरण्टाइन करावे, अशी मागणी होत आहे. सदर लोकांना मुंबईवरून कसे सोडले जाते, त्यांना सोडताना त्यांची योग्य चाचणी केली जाते किंवा नाही, ्रअशी शंका तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या