शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

चांदवड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रा

By admin | Updated: April 20, 2016 00:38 IST

चांदवड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रा

 चांदवड : जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याण महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महावीरांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक गुजराथ गल्लीतील जैन मंदिरापासून सोमवारपेठ, श्रीरामरोड, वरचेगावमार्गे जैन स्थानकापर्यंत काढण्यात आली. ठिकठिकाणी जैन महिलांनी पालखीचे पूजन केले.मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या जीवनावर पडलेल्या चौदा स्वप्नांच्या देखाव्याचा चित्ररथ होता. यात शीतल आबड, सौ. आबड व बालकलाकारांनी सहभाग घेतला, तर वरच्या गावातील दिगंबर जैन नवीन मंदिराजवळ समाजबांधवांच्या वतीने पाणी व सरबताची व्यवस्था केली होती. गौतम स्वामीजी का जाप व भगवान महावीर हमसे क्या चाहते है यावर प्रवचन झाले. यावेळी ध्यान योगी आचार्य सम्राट १००८ डॉ. शिवमुनी म.सा. , साधक गुरुदेव पूज्य हसमुखमुनी म.सा. परमविदुषी महासती, पूनितज्योती म. सा. इनकी सुशिष्या मधुर व्याख्याती, मधुर गायिका जागृती म.सा. एवं ध्यान साधिका वत्सलश्री म.सा. यांचे व्याख्यान झाले. यावेळी श्री आदर्श जैन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौतम प्रसादीचे वाटप करण्यात आले, तर सायंकाळी गुजराथ गल्लीतील जैन मंदिरात भक्तिसंध्येचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जैन मंडळातर्फे विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमास उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुंगरवाल, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जैन युवक मंडळाचे अध्यक्ष सुनील आबड, अशोकचंद आचलिया, राजकुमार संकलेचा, प्रवीण डुंगरवाल, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र कासलीवाल, मेहुल आचलिया, जवाहरलाल आबड, जवरीलाल संकलेचा, रमणलाल आचलिया, प्रकाश आबड, प्रवीण हेडा, मोरारजी ओस्तवाल, रवींद्र आबड, सुरेश कांकरिया, सुभाष श्रीश्रीमाळ, बाळासाहेब ललवाणी, शांतीलाल ललवाणी, मोहनलाल अजमेरा आदिंसह समाजबांधव, महिला, नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रममधील सर्व शिक्षक, मुली उपस्थित होते.