शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी शिवसेनेचे गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:16 IST

सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. ऐनवेळी भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड घोषित केली.

सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. ऐनवेळी भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड घोषित केली.सातपूर विभागीय कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेचे संतोष गायकवाड आणि भाजपाचे हेमलता कांडेकर हे दोघे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला यावेळेत भाजपाचे हेमलता कांडेकर यांनी माघार घेतली. गायकवाड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गायकवाड यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. या निवडणुकीत सलीम शेख, दिनकर पाटील, योगेश शेवरे, वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, शशीकांत जाधव, इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, अलका अहिरे, विलास शिंदे, नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, दिलीप दातीर, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, सीमा निगळ आदी सहभागी झाले होते, तर रिपाइंचे नगरसेवक दीक्षा लोंढे निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहिल्या. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे आगमन झाले.गायकवाड यांची बिनविरोध झाल्यानंतर आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, महेश हिरे, अजय बोरस्ते, देवा जाधव, नाना वाघ, अलका गायकवाड आदींसह युतीच्या पदाधिकाºयांनी व नगरसेवकांनी गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रभाग क्रमांक १० च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार इंदुबाई नागरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी शिवसेनेने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्याची परतफेड म्हणून प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत भाजपाने माघार घेत शिवसेनेला मदत केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. यापुढेही शिवसेना-भाजपा युती अभेद्य राहील.- विलास शिंदे, गटनेता शिवसेना

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना