शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत नेतृत्व बदलाचे संकेत; जिल्हाप्रमुखपदी बडगुजर ? खांदेपालट : आगळे, दातीर यांचीही नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:05 IST

नाशिक : शिवसेनेच्या शहर नेतृत्वात खांदेपालट केल्यानंतर आता जिल्हा शिवसेनेच्या नेतृत्वातही बदल करण्याचे संकेत मिळू लागले असून, त्यासाठी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे.

ठळक मुद्देसेनेतील जुन्या पदाधिकाºयांशी त्यांचे सख्य आहेभंगार बाजार हटविण्यासाठी त्यांनी महापालिकेला भाग पाडले

नाशिक : शिवसेनेच्या शहर नेतृत्वात खांदेपालट केल्यानंतर आता जिल्हा शिवसेनेच्या नेतृत्वातही बदल करण्याचे संकेत मिळू लागले असून, त्यासाठी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय जगन आगळे व नगरसेवक दिलीप दातीर यांच्याही नावांची चर्चा होऊ लागली आहे. पक्ष नेतृत्वाने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात बदल करण्यामागचे कारण स्पष्ट केले नसले तरी, अजय बोरस्ते यांच्यावर महानगरप्रमुख व मनपा विरोधी पक्षनेतेपद अशी दुहेरी जबाबदारी असल्यामुळे फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता एका महानगरप्रमुखाकडून पक्ष संघटना बांधणीस मर्यादा पडू शकते हे हेरून मुंबईच्या धर्तीवर एकापेक्षा अधिक महानगरप्रमुख नेमण्याचा पॅटर्न नाशकात वापरण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेतही फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी मध्यंतरी पक्ष नेत्यांची भेट घेऊन फिल्डिंग लावली आहे.उत्तर महाराष्टÑाचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिकचीही जबाबदारी असल्यामुळे त्यांची याकामी महत्त्वाची भूमिका आहे. त्यातूनच राऊत यांचे निकटवर्तीय नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. बडगुजर हे तिसऱ्यांदा नाशिक महापालिकेत निवडून आले आहेत. सेनेतील जुन्या पदाधिकाºयांशी त्यांचे सख्य आहे. अशा परिस्थितीत बडगुजर यांचे पारडे जड मानले जात आहे. याशिवाय नाशिक तालुक्याचे नेते जगन आगळे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. आगळे हे कट्टर सैनिक असून नाशिक, सिन्नर या तालुक्यावर त्यांचे प्रभुत्व आहे. नगरसेवक दिलीप दातीर हेदेखील स्पर्धेत आहेत. नाशिक शहरातील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी त्यांनी महापालिकेला भाग पाडले तसेच दोन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत असलेले तिघेही इच्छुक एकाच गटातील असल्यामुळे त्यांच्यात सहमती घडवून आणणे पक्ष नेतृत्वाला सहज शक्य आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भातील घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.