शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी रोखली वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:35 IST

‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’, ‘कहॉ गये अच्छे दिन’, ‘ हिंदू-मुस्लीम, सीख-इसाई सबके घर पहुची महंगाई’ असे विविध घोषवाक्य लिहिलेले काळे फलक व भगवे झेंडे हातात घेऊन द्वारकेवर भाजपा सरकारच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी येथे ठिय्या आंदोलन करत सुमारे तासभर वाहतूक रोखली.

नाशिक : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’, ‘कहॉ गये अच्छे दिन’, ‘ हिंदू-मुस्लीम, सीख-इसाई सबके घर पहुची महंगाई’ असे विविध घोषवाक्य लिहिलेले काळे फलक व भगवे झेंडे हातात घेऊन द्वारकेवर भाजपा सरकारच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी येथे ठिय्या आंदोलन करत सुमारे तासभर वाहतूक रोखली.  पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅसच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ सर्वसामान्यांच्या जिवावर उठली आहे; मात्र भाजपा सरकारला याबाबत काहीही देणे-घेणे नसून दररोज होणारी इंधनाची दरवाढ थांबवावी, पेट्रोल, गॅसचे दर कमी करावे या मागणीसाठी शहर-जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.२७) द्वारकेवर सकाळी अकरा वाजता ठिय्या व घंटानाद आंदोलन करण्यात आले.  शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, डी. जे. सूर्यवंशी, सूर्यकांत लवटे, सुधाकर बडगुजर, श्याम साबळे, दिलीप दातीर, महिला आघाडीच्या शालिनी दीक्षित, वाहतूक सेनेचे शिवाजी भोर, विद्यार्थी सेनेचे योगेश बेलदार, उमेश चव्हाण, माजी नगरसेवक संजय चव्हाण आदी पदाधिकाºयांसह शेकडो शिवसैनिकांनी द्वारकेवरील सर्व रस्त्यांच्या प्रारंभी ठिय्या देत वाहतूक पूर्णपणे रोखली. मुंबई नाका, जुने नाशिक, सारडा सर्कलच्या दिशेने शेकडो शिवसैनिक हातात भगवे ध्वज घेऊन घोषणाबाजी करत द्वारकेवर दाखल झाले. मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणाºया या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले.  दरम्यान शिर्डीकडे जाणाºया गुजरात परिवहन महामंडळाच्या बसवर शिवसैनिकांनी भगवा ध्वज लावला. तसेच या बसला द्वारका वाहतूक बेटाभोवती अडवून बसपुढे ठिय्या दिला. गळ्यात गाजरांचे हार ‘देशाचा आवाज काय सांगतो, गाजर पुरेसे अख्खा देश बोलतो...’ अशा घोषणेचे फलक झळकवित शिवसैनिकांनी गाजराचे तयार केलेले हार गळ्यात घालून सत्ताधारी भाजपा सरकारचा निषेध नोंदविला. तसेच हातात गाजर घेऊन आंदोलकांनी भाजपाने जनतेला आश्वासनांचे गाजर दाखविल्याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध घोषणा देत शिवसैनिकांनी द्वारका परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाTrafficवाहतूक कोंडी