प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, खंडू बोडके, बबन कदम यांच्या हस्ते दूध अभिषेक करून करण्यात आला. किल्ल्यावर रांगोळी, फुलांची आरास तयार करून किल्ले रामशेजची शोभा वाढविण्यात आली. स्वराज्य परिवाराच्या कार्यकर्त्यांनी रामशेजची स्वच्छता केली. रामशेज ठिकाणी असणाऱ्या विविध कुंडांचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली. नेहरे यांनी याप्रसंगी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले. शिवराज्याभिषेक सोहळा देशातील प्रथम स्वातंत्र्य दिन आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला डॉ. सतीश देशमुख, महेंद्र पवार, नामदेव जोपळे, सोमनाथ बर्डे, श्रेयस जाधव, प्रतीक पाटील, योगेश खैरनार, अविनाश कोठुळे, विनोद बिरारी, दीपक मोगल, मोहन गरुड, रेखा नेहरे, गायत्री बिरारी, चारुशीला पाटील, योगिता सोनवणे उपस्थित होते.