पंचवटी : म्हसरूळ येथील उत्तर महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराम मंदिरात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक तसेच महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अरुण पवार, अखिल भारतीय मराठा महासंघ, छावा संघटना, जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी केदारआप्पा, प्रभाग सभापती शालिनी पवार, नगरसेवक रंजना भानसी, सुधाकर नेवे, श्याम पिंपरकर, कैलास पिंगळे, संजय फडोळ, मधुकर कासार, आशिष हिरे, माधुरी भदाणे, प्रशांत उशीर, तुषार देशमुख आदि उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेड जिल्हाप्रमुख माधुरी भदाणे यांनी शिवरायांची विचारधारा प्रत्येक तरुणाने स्वीकारली तर मोठी क्रांती देशात होईल, असे सांगितले. संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी शिवराय हे एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर ते सर्वसमावेशक होते. त्यांचे विचार अंगीकारल्यास चांगले राष्ट्र निर्माण होईल, असे सांगितले. जिल्हा नशाबंदी मंचनाशिक जिल्हा नशाबंदी मंच व युवा कलाकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गं. पां. माने, प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश अहेर, रवि घुगे, अंजली वैद्य, सुमन जगताप उपस्थित होते. शिवछत्रपती स्मारक, सीबीएस नाशिक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन जगताप, सूत्रसंचालन मसूद पठाण व सूर्यकांत अहेर यांनी आभार मानले. यावेळी गं. पां. माने म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. कोण्या एका जाती धर्माचे नसून ते बहुजनांचे राजे होते. आजही त्यांचे नाव घेतले की, छाती अभिमानाने फुलून जाते. मयूर गउल, विनय रेव्हर, चेतन बागुल, जगदीश पावडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. (वार्ताहर)
शिवराज्याभिषेक दिन साजरा
By admin | Updated: June 7, 2014 01:47 IST