शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

टेंभ्यात अवतरली शिवशाही

By admin | Updated: July 29, 2014 00:53 IST

अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण : गावकऱ्यांनी दारी उभारल्या गुढ्या

नामपूर : दिवाळी-दसऱ्यासारखे गावातील प्रत्येक दारासमोर सडा, रांगोळ्या...दाराला तोरणे, घरावर भगव्या गुढ्या...तुताऱ्यांचा निनाद...ढोल-ताशांचा गजर अन् सोबतीला ध्वनीक्षेपकावरून शिवरायांच्या पराक्रमाचे गुणगान गाणारे पोवाडे यामुळे आख्या खालच्या टेंभ्यात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता...निमित्त होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचे!सरंपच भाऊसाहेब अहिरे यांच्या संकल्पनेतून आणि पदराच्या ४३ लाख रुपयांच्या खर्चातून साकारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बडोद्याचे माजी खासदार सत्यजितराजे गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापराव सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार उमाजी बोरसे, दादा भुसे, माजी आमदार डॉ. दौलतराव अहेर, दिलीप मंगळू बोरसे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी अहेर व विक्रीकर आयुक्त अविनाश भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पेशवाई ग्रुपचे मावळे, घोड्यावर स्वार जिजाऊ मातेच्या वेशातील कलावंत अग्रभागी घेऊन प्रमुख पाहुण्यांची ढोल-ताशे व तुताऱ्यांच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद येथील शिवशाहीर सुरेश जाधव यांनी शिवचरित्रावर पोवाडा सादर केला. टेंभ्यात साकारलेला शिवरायांचा भव्य पुतळा गावातील तरुणपिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे गायकवाड यांनी सांगितले. खासदार भामरे यांनी गाव परिसरात झालेल्या गावकऱ्यांच्या सहभागातून झालेल्या छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांमुळे गावाचा पाणीप्रश्न सुटला असून, गावाने जंगलाचे संगोपन केल्यामुळे हे गाव राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. त्यात मांजरपाडा १ व २ या प्रकल्पाबाबत चर्चा तसेच बागलाण, कळवण, देवळा व मालेगाव हे तालुके दुष्काळी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमात भाऊसाहेब अहिरे यांचा गावकऱ्यांच्या हस्ते, तर प्रमुख अतिथींच्या हस्ते पुतळा तयार करणाऱ्या किशोर महाजन यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)