शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते नाही आदित्य ठाकरे : नाशिक दौºयात शिवसैनिकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:31 IST

शिवसेनेचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरते नाही, त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे़

ठळक मुद्देआदित्य ठाकरे नाशिक दौºयावरभाजपाची लाट ओसरल्याचे समोर

नाशिक : शिवसेनेचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरते नाही, त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे़ नुकत्याच ठाणे येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इगतपुरी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली आहे़ आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्येही सेनेला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (दि़१९) पदाधिकाºयांना मार्गदर्शन करताना केले़आदित्य ठाकरे हे नाशिक दौºयावर असून, मंगळवारी सायंकाळी शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ठाकरे म्हणाले की, गुजरात निवडणुकीच्या निकालावरून भाजपाची लाट ओसरल्याचे समोर आले असून, शिवसेनेचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरते नसते हे नागरिकांना दाखविण्याची वेळ आता आली आहे़ ठाकरे यांच्या हस्ते इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे, अ‍ॅड़ श्यामला दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, शहरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिका गटनेते विलास शिंदे, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक राहुल दिवे, दिलीप दातीर, जि. प.चे माजी गटनेते प्रवीण जाधव, पेठचे उपनगराध्यक्ष मनोज घोंगे, निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते.