शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

प्रभाग  सभापतिपदासाठी शिवसेनेत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:54 IST

गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही सिडको प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, सभापतिपदासाठी यंदा इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पहिल्या वर्षी ज्यांना शिवसेनेकडून विविध पदांची संधी दिली गेली अशांना डावलून इतर इच्छुकांचा विचार केला जाणार असल्याचे समजते.

नरेंद्र दंडगव्हाळ ।सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही सिडको प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, सभापतिपदासाठी यंदा इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पहिल्या वर्षी ज्यांना शिवसेनेकडून विविध पदांची संधी दिली गेली अशांना डावलून इतर इच्छुकांचा विचार केला जाणार असल्याचे समजते. सिडको प्रभागातून नगरसेवक हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे यांच्या नावांची चर्चा आहे. सिडकोचे एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८, २९ व ३१ चा समावेश करण्यात आला आहे. या सहा प्रभागातील २४ नगरसेवकांमध्ये सेनेच्या कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव आदींचा समावेश आहे. तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, नितीन ठाकरे, छाया देवांग, भगवान दोंदे, संगीता आव्हाड आदींचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले यांचा समावेश आहे. शिवसेना १४, भाजपा ९ व राष्टÑवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे.सिडको प्रभागात सेनेच्या पाठोपाठ भाजपा दुसºया क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगर सेवक नव्हता, परंतु मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली होती. मागील निवडणुकीत नाशिक मनपामध्ये सत्ता असलेल्या मनसेचे सिडको प्रभागात आठ नगरसेवक होते. यंदा मात्र एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तर कॉँग्रेस, माकपादेखील हद्दपार झाली. सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे.सभापतिपदाची संधी कुणाला?सेनेने पहिल्या वर्षी सिडको प्रभागातून सभापती म्हणून सुदाम डेमसे यांची तर स्थायी समितीवर डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे यांना संधी दिली आहे, तर श्यामकुमार साबळे यांना वृक्षप्राधिकरण समितीवर घेतले आहे. पहिल्या वर्षी ज्या सदस्यांना संधी देण्यात आली आहे त्यांना वगळून इतर सदस्यांना दुसºया वर्षी संधी देण्यात येणार असल्याचे समजते. नगरसेवक हर्षा बडगुजर या दुसºयांदा नगरसेवक झाल्या असून, पहिल्या पंचवार्षिकमध्ये पाच वर्षांत त्यांना एकही पद दिले नाही. मागील वर्षीदेखील त्यांना सभापतिपदाची संधी होती, परंतु ऐनवेळी त्यांना डावलून नगरसेवक सुदाम डेमसे यांची सभापतिपदी वर्णी लागली. यंदा हर्षा बडगुजर यांना सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी बडगुजर यांच्या बरोबरच नगरसेवक श्यामकुमार साबळे व चंद्रकांत खाडे यांनीदेखील इच्छा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक