नाशिक : शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आज अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा महंत ग्यानदास यांच्याकडे धाव घेतली व त्यांना कुंभमेळ्यात सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रमुख साधू-महंतांना भेटून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्याचे आदेश स्थानिक शिवसेना नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार आज शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी आमदार बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, विनायक पांडे, दत्ता गायकवाड यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी तपोवनात मुक्कामी असलेल्या महंत ग्यानदास यांची भेट घेतली. कुंभमेळ्याच्या काळात साधू-महंतांना कोणतीही अडचण जाणवल्यास त्यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधावा. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे यावेळी उद्धव ठाकरे यांच्या वतीने ग्यानदास यांना सांगण्यात आले. त्यावर ग्यानदास यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिवसेना नेत्यांची ग्यानदासांकडे धाव
By admin | Updated: July 8, 2015 15:05 IST