शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

स्त्री रुग्णालयाच्या वादात शिवसेनेची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:14 IST

स्त्री रुग्णालयाला जागा कोणती द्यायची हा अधिकार महासभेचा असून, त्याबाबत कुठलीही चर्चा न करता मागील दाराने मंजुरी देण्यात आलेली आहे. स्त्री रुग्णालय व्हायलाच हवे परंतु, ते कुठे व्हावे यासाठी मुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या दरबारात नव्हे तर महासभेत चर्चा करण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

नाशिक : स्त्री रुग्णालयाला जागा कोणती द्यायची हा अधिकार महासभेचा असून, त्याबाबत कुठलीही चर्चा न करता मागील दाराने मंजुरी देण्यात आलेली आहे. स्त्री रुग्णालय व्हायलाच हवे परंतु, ते कुठे व्हावे यासाठी मुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या दरबारात नव्हे तर महासभेत चर्चा करण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.  भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचेच पदाधिकारी व माजी आमदार वसंत गिते यांच्यात शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाला देण्यात येणाºया जागेवरून वाद पेटला आहे. गिते पिता-पुत्रांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा निर्णय अमान्य करत थेट पक्षाविरुद्धच दंड थोपटले असताना शिवसेनेनेही या वादात उडी घेत भाजपाला घेरण्याची संधी घेतली आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले, सदर रुग्णालयाची जागा निश्चित करताना भाभानगरच्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही.  दोन पदाधिकाºयांमध्ये सुरू असलेला वाद भाजपाने त्यांच्या वसंतस्मृती कार्यालयात बसून सोडवावा, विनाकारण त्यासाठी महापालिका व नाशिककरांना वेठीस धरू नये. मुळात सदरचा प्रस्ताव हा महासभेत चर्चेला आणण्याची आवश्यकता होती. परंतु, मागल्या दाराने सारेच सोपस्कार पाडण्याची सवय जडलेल्या भाजपाने परस्पर त्याला मंजुरी दिली.  महासभेचे अधिकार सत्ताधाºयांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिले आहेत काय, असा सवाल करत बोरस्ते यांनी स्त्री रुग्णालयाच्या जागेचा सुरू असलेला फुटबॉल खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्याठिकाणी रुग्णालयाचे आरक्षण आहे तेथेच ते झाले पाहिजे. त्याबाबत महासभेत चर्चा व्हायला हवी. मात्र, परस्पर ठराव करून ते पाठविले जात असल्याबद्दलही बोरस्ते यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या महासभेत सदरचा प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी अन्यथा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. नागरिकांची आज बैठक भाभानगर येथील जॉगिंग ट्रॅक व गायकवाड सभागृहाच्या जागेत उभारण्यात येणाºया स्त्री रुग्णालयास विरोध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी भाभानगर जॉगिंग ट्रॅक बचाव समिती स्थापन केली असून, गुरुवारी (दि.१५) प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांची बैठक सायंकाळी ५.३० वाजता जॉगिंग ट्रॅकवर बोलाविण्यात आली आहे.