औंदाणे : गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या कर्तव्यात कोणतीही कसर न ठेवता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या परीने मदतकार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा जुनी शेमळी (ता. बागलाण ) येथील शिवसेना शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला.याप्रसंगी येथील डॉ. राकेश नागपाल व डॉ. प्रवीण जाधव तसेच शिव मेडिकलचे संचालक अमोल बागुल यांचा कोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना ठेंगोडा गणप्रमुख कैलास खैरनार, जुनी शेमळी शाखाप्रमुख देवेंद्र खैरनार, उपशाखाप्रमुख समाधान गांगुर्डे, सागर बच्छाव, बाळू ढेपले, संघटक विनोद खैरनार, बाळा जाधव, दीपक बच्छाव, भास्कर बच्छाव, दादा बागुल, समाधान शेलार, सुधाकर गांगुर्डे, संजय गांगुर्डे, केदा सोनवणे आदींसह जुनी शेमळी, नवी शेमळी परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.
कोरोनायोध्यांचा शिवसेनेतर्फे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 01:35 IST
औंदाणे : गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या कर्तव्यात कोणतीही कसर न ठेवता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या परीने मदतकार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा जुनी शेमळी (ता. बागलाण ) येथील शिवसेना शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कोरोनायोध्यांचा शिवसेनेतर्फे सन्मान
ठळक मुद्देकोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरव