शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

'महाजनादेश'च्या स्वागताला शिवसेना नगरसेवक पुढे आले, इच्छुकांच्या पोटात धस्स झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 18:05 IST

नगरसेवक सुधाकर बडगुजर भाजपात जाणार अशा चर्चांना संधी मिळून गेली आहे.

नाशिक : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती होईल की नाही याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण असताना आज नाशकात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सिडकोत स्वागत केले, त्यामुळे युती होणार की बडगुजर भाजपात जाणार अशा चर्चांना संधी मिळून गेली आहे.महाजनादेश यात्रा नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरून सिडको मार्गे पंचवटी कारंजा कडे मार्गस्थ होत आहे. सिडकोचा परिसर हा परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवतो. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून सदर यात्रा जात असताना व यात्रेतील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रथावर विद्यमान आमदार भाजपाच्या श्रीमती सीमा हिरे उपस्थित असताना त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणारे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक व गेल्या निवडणुकीत हिरे यांच्याच विरुद्ध शिवसेनेतर्फे निवडणूक लढलेले बडगुजर यांनी सावता नगर येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, त्यामुळे हिरे यांच्या पोटात धस्स होणे स्वाभाविक ठरले.सिडको म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपातील वाढत्या स्पर्धेमुळे भाजपा ऐवजी शिवसेनेला देण्याच्या चर्चा होत आहेत, त्यामुळे बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या स्वागताकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले जाणे स्वभाविक ठरले आहे. अर्थात युती टिकून राहणार असेल तर बडगुजर यांनी केलेल्या या स्वागता कडे गैर म्हणून पाहिले जाणार नाही परंतु जर युती तुटली तर बडगुजर यांना या सत्काराचा वेगळा फटकाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पश्चिम मतदार संघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करणारे अन्यही दावेदार असून ते बडगुजर यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या स्वागताचे मातोश्रीवर भांडवल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्यावेळी विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुक प्रसंगी नाशकात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांने उद्धव ठाकरे यंच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने शिवसेनेतर्फे त्यांचा पत्ता कापला गेल्याचा इतिहास नाशिककर विसरलेले नाहीत. त्यादृष्टीने बडगुजर यांनी आज केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागताकडे पाहिले जात आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस